India-Pakistan War : हा एक फोटोच सर्वकाही सांगून जाईल, पाकिस्तान विरुद्धच भारताच यश

India-Pakistan War : भारताने काल रात्री जम्मू, पठानकोट, उधमपुर आणि काही अन्य ठिकाणी पाकिस्तानचा ड्रोन, मिसाइल हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला होता. सैन्य तळांना लक्ष्य करण्याच्या इराद्याने हा हल्ला करण्यात आला होता.

India-Pakistan War : हा एक फोटोच सर्वकाही सांगून जाईल, पाकिस्तान विरुद्धच भारताच यश
Rajnath Singh
| Updated on: May 09, 2025 | 2:45 PM

भारताने पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरु केलय. या ऑपरेशनच्या यशानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी सैन्य दलाच्या तिन्ही अध्यक्षांची भेट घेतली. ही एक समीक्षा बैठक होती. काल भारताने पाकिस्तानचा सर्व बाजूंनी हवाई हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला. या बैठीकाला चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, एअर चीफ मार्शल एपी सिंह आणि नौदल प्रमुख एडमिरल दिनेश त्रिपाठी उपस्थित होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या फोटोमध्ये सर्वांच चेहरे आनंदी दिसतायत. त्यावर हास्य आहे. लोक या फोटोंवर कमेंट करतायत. पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतरचा हा आनंद आहे असं लोक कमेंटमध्ये म्हणतायत.

भारताने काल रात्री जम्मू, पठानकोट, उधमपुर आणि काही अन्य ठिकाणी पाकिस्तानचा ड्रोन, मिसाइल हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला होता. सैन्य तळांना लक्ष्य करण्याच्या इराद्याने हा हल्ला करण्यात आला होता. पाकिस्तान सुधरण्याच नाव घेत नाहीय. त्यामुळेच तो सतत अयशस्वी हल्ल्याचे प्रयत्न करतोय. भारत आपली संप्रभुता आणि आपल्या लोकांच्या रक्षणासाठी पूर्णपणे तयार आहे, असं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे.

तो हल्ला तसाच परतवून लावला जातो

भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळ नष्ट केले. भारताच्या या कारवाईने पाकिस्तान बिथरला आहे. याच कारणामुळे पाकिस्तानकडून हल्ल्याचे सतत अयशस्वी प्रयत्न होत आहेत. भारत पाकिस्तानी दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर देत आहे. 8 मे रोजी सैन्याने बांसा येथे घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या सात दहशतवाद्यांचा खात्मा केला. पाकिस्तान ज्या पद्धतीने हल्ल्याचा प्रयत्न करतोय, भारत तो हल्ला तसाच परतवून लावतोय.