AMCA Project : फायटर विमान निर्मितीचा प्रचंड अनुभव असतानाही सरकारने HAL ला स्टेल्थ जेट प्रोजेक्टपासून लांब का ठेवलं?
AMCA Project : भारताने पाचव्या पिढीचं स्टेल्थ फायटर विमान बनवण्याच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल उचललं आहे. अमेरिका, चीन आणि रशिया या तीनच देशांकडे अशी विमानं आहेत. भारत सरकारने हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडकडे अशा विमान निर्मितीचा दीर्घ अनुभव असतानाही HAL ला या महत्वाकांक्षी प्रोजेक्टपासून लांब का ठेवलय?.

मागच्या अनेक महिन्यांपासून भारताच्या AMCA प्रोजेक्टची चर्चा सुरु होती. मागच्या आठवड्यात भारत सरकारने त्या बद्दल अत्यंत महत्वाचं पाऊल उचललं आहे. AMCA म्हणजे एडवांस्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट. भारताचा हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. AMCA प्रोजेक्ट अंतर्गत भारत नव्या फायटर विमानाची निर्मिती करणार आहे. हे पाचव्या पिढीचं फायटर विमान असेल,म्हणजे स्टेल्थ. सध्या भारताकडे चौथ्या आणि 4.5 जनरेशनची फायटरं विमानं आहेत. पण पाचव्या पिढीचं फायटर विमान ही काळाची गरज आहे. आपल्याला ज्या देशांचा शेजार लाभला आहे, चीन त्याने पाचव्या पिढीच फायटर जेट विकसित केलं आहे. चीनकडे J-20 आणि J-35A ही पाचव्या पिढीची फायटर विमानं आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या आधी आणि नंतर अशाही बातम्या आल्या की, चीन J-35A हे फायटर जेट पाकिस्तानला देणार आहे. खरंतर पाकिस्तानची पाचव्या पिढीचं सोडा, चौथ्या पिढीचं पण विमान घ्यायची आज औकात नाहीय. पण भारताला नडण्यासाठी, भारताच्या लष्करी क्षमतेची चाचपणी करण्यासाठी चीन नक्कीच ही विमानं पाकिस्तानी देऊ शकतो. त्यात चीनच...