Delhi Blast Case : आरोपी डॉक्टरचा जगाला हादरवणारा खुलासा, ब्लास्ट घडवण्यासाठी Appचा वापर; असा रचला डाव

दिल्ली ब्लास्ट प्रकरणातील आरोपी डॉक्टर उमरने धक्कादायक खुलासे केले आहेत. स्फोटकांचा पुरवठा, साठवणूक आणि संपूर्ण डाव रचण्यासाठी सिग्नल ॲपचा वापर केला गेला. अमोनियम नायट्रेट आणि इतर रसायने खरेदी करून, त्याची माहिती ॲप ग्रुपमध्ये दिली जात असे. पाकिस्तानी हँडलर्सच्या सूचनेनुसार हे षडयंत्र रचले गेले असून, त्यात अनेक डॉक्टरांचा सहभाग समोर आला आहे.

Delhi Blast Case : आरोपी डॉक्टरचा जगाला हादरवणारा खुलासा, ब्लास्ट घडवण्यासाठी Appचा वापर; असा रचला डाव
दिल्ली स्फोट प्रकरणी रोज नवनवी माहिती उघड होत आहे.
Image Credit source: social media
Updated on: Nov 18, 2025 | 2:03 PM

दिल्ली ब्लास्टमधील (Delhi Blast Case) आरोपी डॉक्टरने धक्कादायक खुलासा केला आहे. डॉक्टर उमरची या ब्लास्टमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका होती. डॉक्टर उमरने अमोनियम नायट्रेट, ट्रायएसिटोन ट्रायपरॉक्साईड वा अन्य केमिकल्स खरेदी करायचा. त्याची संपूर्ण माहिती त्यांच्या ग्रुपमध्ये टाकली जायची. किती प्रमाणात हे केमिकल्स खरेदी करण्यात आले? कोणत्या स्त्रोतांकडून घेण्यात आले आणि पुढे कशी तयारी करायची? याची डिटेल्स या ग्रुपमध्ये शेअर केली जायची. अमोनियम नायट्रेट , टीएटीपी, सल्फर डायऑक्साईडसहीत बहुतेक स्फोटक केमिकल्स आणि टायमर, वायर सारखी उपकरणे उमरने खरेदी केल्याचं डीजिटल फुटप्रिंट्समधून स्पष्ट झालं आहे.

जैश ए मोहम्मदच्या पकडण्यात आलेल्या मॉड्युलशी संबंधित डॉक्टरांची यंत्रणांनी कसून चौकशी सुरू केली आहे. डॉक्टरच्या मोबाईलमधून अत्यंत धक्कादायक खुलासे झाले असून महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. आरोपींच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली असून त्यात सिग्नल ॲप आढळून आला आहे. आरोपी दहशतवादी कारवायांसाठी सिग्नल ॲपचा वापर करत असल्याचं उघड झालं आहे. या ॲपच्या ग्रुपचा ॲडमिन फरार आहे. त्याचं नाव डॉक्टर मुजफ्फर असल्याचं समोर आलं आहे. तसेच या ग्रुपमध्ये डॉक्टर उमर, डॉक्टर मुजम्मिल, डॉक्टर आदिल आणि डॉक्टर शाहीन होते, अशी माहितीही तपासातून उघड झाली आहे.

ही स्फोटकं सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी डॉक्टर मुजम्मिलकडे सोपवण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जेव्हा केव्हा मुजम्मिल हे स्फोटक आणि केमिकल्सचे स्टॉक भाड्याच्या घरात शिफ्ट करायचा, तेव्हा तो त्याचे फोटो काढून ग्रुपमध्ये टाकायचा. सर्व साहित्य सुरक्षितपणे योग्य ठिकाणी पोहोचल्याचं दाखवण्यासाठी तो हे करायचा, असं तपासात उघड झालं आहे. एवढेच नव्हे तर या मॉड्युलने खरेदी केलेल्या i20 कारची माहितीही डॉक्टर उमरने ग्रुपमध्ये फोटो काढून टाकली होती.

नवीन नाव समोर

या चौकशीत फैसल इशाक भट्टचे नाव पुढे आले आहे. भट्ट हा जैश ए मोहम्मदशी संबंधित हँडलर असल्याचं सांगितलं जात आहे. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटकं एकत्र करणे, त्याची तयारी, स्फोटकांची टेस्टिंगसहीत मॉड्युलशी संबंधित माहिती रोज या हँडलरला देण्याचं काम डॉक्टर उमरच करत होता. या बाबतची सर्व माहिती आणि सूचना फैसल इशाक भट्टलाच दिली जायची. मात्र, ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यांनी या हँडलरची अद्याप ओळख पटवलेली नाही.

चार पाकिस्तानी हँडलरची नावे समोर

एजन्सींनी दिलेल्या माहितीनुसार, फरार झालेला मुजफ्फर अफगाणिस्तानात गेल्यावर या मॉड्युलचं संचलन आणि रिपोर्टिंग करण्याची जबाबदारी याच हँडलरवर होती. हँडलर +966 कोड असलेल्या सौदी अरेबियाच्या व्हर्च्युअल नंबरचा वापर करत होता. त्यामुळे यंत्रणा आता त्याचा तपास घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, फैसल इशाक भट्ट हे नाव सुद्धा खोटं असण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील जैशच्या नेटवर्ककडून मुद्दाम पाकिस्तानी नावाचा पावर केला जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील स्थानिक पाकिस्तानींचा हात असल्याचं लपवण्यासाठीचं हे षडयंत्र असू शकतं, असं सांगितलं जातं. आतापर्यंतच्या तपासात जैशच्या चार पाकिस्तानी हँडलरचं नाव उघड झालं आहे. अबू उक़ाशा,हंजुल्लाह, निसार आणि फैसल इशाक भट्ट हे ते चार हँडलर आहेत.