
Delhi Car Blast latest Updates : राजधानी दिल्लीत (Delhi Blast) सोमवारी (10 नोव्हेंबर) संध्याकाळी झालेल्या स्फोटामध्ये दहशतवादी उमर याचा मृत्यू झाला आहे. या आत्मघातकी स्फोटात त्याने कारमध्ये बसू स्वत:लाही उडवलं. डीएनए सँपलवरून त्याचा मृत्यू झाल्याचे कन्फर्म झाले आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेला दहशतवादी उमर आणि त्याच्या सहकारी डॉक्टरांबद्दल नवीन खुलासे समोर आले आहेत. फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलमध्ये अटक करण्यात आलेल्या दहशतवादी डॉक्टरांची आणि उमरच्या हँडलर्सची ओळख पटली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी डॉक्टर ज्या हँडलरच्या संपर्कात होते तो दिल्लीपासून शेकडो मैल दूर तुर्कि येथे बसला आहे.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनुी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी कार स्फोटात मारला गेलेला दहशतवादी डॉ. उमर आणि फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलमध्ये अटक करण्यात आलेल्या दहशतवादी, हे ज्या हँडलरच्या संपर्कात होते त्याचे नाव UKasa असं होतं. पण हा UKasa अखेर आहे तरी कोण असा सवालही उपस्थित होत आहे. ते फेक (खोटं ) नाव आहे की एखांद कोड नेम ? तो कुठे रहायचा, आणि दहशतवादी डॉक्टर्सशी त्याची ओळख कशी झाली ? जैशशी त्याच काय कनेक्शन आहे ? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.
कोण आहे Ukasa?
सूत्रांच्या माहितीनुसार, डॉक्टर्सच्या या हँडलरचं नाव Ukasa हे कोड नेमदेखील असू शकतं. सुरक्षा एजन्सीना तसा संशय आहे. 2900 किलो अमोनियम नायट्रेटसह अटक केलेल्या दहशतवाद्यांनी डॉक्टर्स सेशन ॲपद्वारे (Session aap) त्यांच्या हँडलरशी संपर्क साधला. सध्या, या हँडलरचे स्थान अंकारा असल्याचे वृत्त समोर आले असून तो जैशशी संबंधित असू शकतो. अंकारा ही तुर्कीची राजधानी आहे. यापूर्वीही दिल्ली स्फोटाचे तुर्की कनेक्शन समोर आले आहेत.
दिल्ली स्फोटाचे तुर्की कनेक्शन
सूत्रांनी दिलेल्या नुसार, मार्च 2022 मध्ये काही व्यक्ती भारतातून तुर्कीला गेले होते. त्या काळात त्यांचे ब्रेनवॉश करण्यात आले असावे असा संशय व्यक्त होत आहे. डॉक्टर उमर, आदिल आणि मुझम्मिल हे दहशतवादी तुर्कीला गेले आणि तेथे त्यांच्या हँडलर्सना भेटले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तिथे त्या हँडलरने तुर्कीमध्ये त्यांच्या राहण्याची आणि येण्या-जाण्याची सोय केली होती अशी माहिती देखील समोर आली आहे.
जम्मू- काश्मीर पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान डॉक्टरांच्या दहशतवाद मॉड्यूलचा पर्दाफाश झाला. त्यानंतर, जम्मू आणि काश्मीर आणि हरियाणा पोलिसांनी फरीदाबादमध्ये संयुक्त छापा टाकला. छाप्यादरम्यान 2900 किलो अमोनियम नायट्रेट स्फोटके जप्त करण्यात आली. ही कारवाई समोवारी सकाळी झाली आणि त्याच संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कारमध्ये हा भीषण स्फोट झाला. दहसतवादी डॉ. उर हाच ती कार चालवत होता आणि स्फोटादरम्यान तो या कारमध्येच होता. या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी आहेत.