आत्मघातकी हल्ला होता दिल्ली बॉम्बस्फोट? पुलवामापर्यंत पोहोचला तपास, धक्कादायक माहिती समोर

Delhi Lal Fort Blast : दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटमुळे देश हादरला आहे. याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत असून, CCTV फुटेजच्या माध्यामातून तपास करत आहेत... संशयित दहशतवाद्यांशी संबंधित माहिती देखील गोळा केली जात आहे.

आत्मघातकी हल्ला होता दिल्ली बॉम्बस्फोट? पुलवामापर्यंत पोहोचला तपास, धक्कादायक माहिती समोर
फाईल फोटो
| Updated on: Nov 11, 2025 | 9:22 AM

Delhi Lal Fort Blast : राजधानी दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण देश हादरला आहे. हा स्फोट लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 च्या बाहेर झाला आहे… झालेला स्फोट इतका भयानक होती की, आजूबाजूला उभ्या असलेल्या गाड्यांनी देखील पेट घेतला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात बेकायदेशीर घडामोडी कायदा (UAPA), स्फोटके कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांचा तपास सध्या सुरु आहे. पण या ब्लास्टच्या मागे कोण आहे? हा आत्मघातकी हल्ला आहे का? खरं तर, कारच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पण, अद्याप दहशतवादी हल्ला असल्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.

सांगायचं झालं तर, या हल्ल्यात 9 लोकांचं निधन झालं असून 20 जण जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी 7 वाजता दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलवर एका i20 कारचा स्फोट झाला. याचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.

स्फोटाची सुचना मिळाल्यानंतर, 10 मिनिटांच्या आज दिल्ली पोलीस आणि दिल्ली स्पेशल ब्रांचच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या. यावर अमित शाह म्हणाले, “मी दिल्लीचे सीपी आणि स्पेशल ब्रांचच्या प्रभारीशीही बोललो आहे. आम्ही सर्व शक्यतांचा शोध घेत आहोत आणि ते लक्षात घेऊन सखोल चौकशी करू.”

कार आणि कार मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात

दिल्ली पोलिसांनी संध्याकाळी उशिरा कार मालक मोहम्मद सलमानला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून गाडीबद्दल चौकशी केली. त्याने सांगितल्यानुसार, त्याने दीड वर्षांपूर्वी ओखला येथील देवेंद्र नावाच्या व्यक्तीला गाडी विकली होती. त्यानंतर ही गाडी अंबाला येथील एका व्यक्तीला आणि नंतर पुलवामा येथील तारिक नावाच्या व्यक्तीला विकण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने सांगितलं आहे. पोलिस त्या व्यक्तींचा माग काढत आहेत.

दिल्लीत हाय अलर्ट

हल्ल्यानंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. स्फोटानंतर जळत्या गाड्यांमधून आगीच्या ज्वाळा निघाल्याने परिसरात दहशत माजली आहे. याप्रकरण पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या शोध घेत आहे. पोलीस स्थानिक लोकांची चौकशी करत आहे आणि प्रत्यक्षदर्शींना घटनेपूर्वी कोणत्याही संशयास्पद हालचालींबद्दल माहिती देण्यास सांगत आहे.