दिल्लीचा नवा मुख्यमंत्री उद्या ठरणार, केजरीवाल 4.30 सोपवणार उपराज्यपालांकडे सोपवणार राजीनामा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली होती. उद्या दुपारी केजरीवाल आपला राजीनामा उपराज्यपालांकडे सोपवणार असल्याची माहिती समजत आहे.

दिल्लीचा नवा मुख्यमंत्री उद्या ठरणार, केजरीवाल 4.30 सोपवणार उपराज्यपालांकडे सोपवणार राजीनामा
अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा
| Updated on: Sep 16, 2024 | 11:41 PM

दिल्लाचे मुख्यमंंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी जेलमधून बाहेर आल्यावर राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुार उद्या मंगळवारी दुपारी 4.30 वाजता राजीनामा देणार असल्याची माहिती समजत आहे. त्याआधी सकाळी 11.30 वाजता आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाला मंजुरी देण्यात येणार आहे. राजीनाम्यासोबतच अरविंद केजरीवाल विधीमंडळ पक्षाच्या नेत्याचे नाव आणि समर्थन पत्र एलजीला सुपूर्द करतील. 13 सप्टेंबरला मद्य धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल यांनी 15 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती.