मेट्रो बंद… इंटरनेट बंद… आज दिवसभरात काय घडलं? दिल्लीतील CJP आंदोलनाच्या 5 मोठ्या अपडेट्स
नीट पेपरफुटीविरोधात दिल्लीत CJP ने पुकारलेल्या विद्यार्थी आंदोलनाने जोर धरला आहे. हजारो विद्यार्थी जंतरमंतरवर शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. आंदोलनामुळे दिल्लीत मेट्रो सेवा आणि इंटरनेट बंद आहे. पंतप्रधानांनी पेपरफूटप्रकरणी दोषींवर फास्ट ट्रॅक कारवाईचे आश्वासन दिले आहे.

गेल्या चार दिवसांपासून जंतरमंतरवर देशभरातील तरुणांनी एल्गार पुकारला आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी हे विद्यार्थी करत आहेत. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर लाठीमार झाला तरी विद्यार्थी मैदानातून हटायला तयार नाहीत. मैदानात आजही हजारो विद्यार्थी ठाण मांडून आहेत. आजही विद्यार्थ्यी मैदानात ठाण मांडून आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. पंतप्रधानांच्या ट्विटपासून मेट्रो बंद असण्यापर्यंतच्या घडामोडी आज घडल्या आहेत.
आजच्या 5 महत्त्वाच्या घडामोडी…
दिल्ली मेट्रोचे 17 स्टेशन सलग दुसऱ्या दिवशी बंद राहिले. नंतर झंडेवाला मेट्रो स्टेशनही बंद करण्यात आला. मेट्रो स्टेशन बंद असल्याने कामावर जाणाऱ्यांना इतर खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच काहींना जास्तवेळ प्रवास करावा लागला. दिल्लीत आजही इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे संपर्काचं महत्त्वाचं साधन ठप्प झालं आहे.
अभिनेत्री आलिया भट्टने विद्यार्थी आंदोलनाचं समर्थन केलं. तिने या संदर्भात इन्स्टावर पोस्ट लिहिली आहे. जे या देशाचं भविष्य आहे. भविष्यकाळ त्यांचाच आहे, त्या विद्यार्थ्यांचा संकल्प पाहून आपण खरोखरच त्या तरुणांचं ऐकतोय का? असा सवाल आपल्याला सर्वांसाठी उभा राहिला आहे.
गेल्या 26 दिवसांपासून सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे. त्यांच्या पत्नी गीतांजली म्हणतात, मुलांना गुन्हेगारांसारखं वागवू नये. काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यापेक्षा विद्यार्थ्यांसोबत उभं राहायला हवं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट केलं. पेपर लीकप्रकरणातील दोषींना शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट बनवले जातील. तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करू पाहणाऱ्यांना सोडलं जाणार नाही.
कॉकरोच जनता पार्टीच्या निदर्शनाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे. आंदोलकांनी दिल्लीला वेठीस धरल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. अनेक रस्ते बंद आहेत. सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, असंही याचिकेत म्हटलं आहे.
गेल्या 3 दिवसात काय घडलं?
20 जुलै- CJP चा संसद मार्च, पोलिसांचा लाठीचार्ज, अनेकांची डोकी फुटली
21 जुलै- चर्चा करायची असेल तर सरकारने स्वत: यावं, अभिजीत दीपकेंची भूमिका
22 जुलै- सरकारने हमी दिली तर उपोषण सोडणार, वांगचुक यांचं मोठं विधान
बंद असलेली 16 मेट्रो स्टेशनं
लोकमान्य मार्ग
राजीव चौक
पटेल चौक
रामकृष्ण आश्रम मार्ग
बाराखंबा रोड
सुप्रीम कोर्ट
सेवा तीर्थ
जनपथ
मंडी हाऊस
सेंट्रल सेक्रेटरियट
आयटीओ
इंद्रप्रस्थ
खान मार्केट
जोर बाग
शिवाजी स्टेडियम