Dhruv Rathi: मोठी बातमी! ध्रुव राठीविरोधाात अजामीनपात्र वॉरंट जारी; दिल्लीतील न्यायालयाचा दणका

तक्रारदार विकास संकृत्यायन यांनी आरोप केला आहे की, ध्रुव राठी यांनी 'भाजप आयटी सेल भाग २' नावाचा व्हिडिओ प्रसिद्ध करून त्यांच्यावर खोटे आणि बदनामीकारक आरोप केले आहेत. तक्रारदाराने जर्मनीमध्ये राहणाऱ्या ध्रुव राठी यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती.

Dhruv Rathi: मोठी बातमी! ध्रुव राठीविरोधाात अजामीनपात्र वॉरंट जारी; दिल्लीतील न्यायालयाचा दणका
Dhruv Rathi
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Nov 23, 2026 | 2:29 PM

Dhruv Rathi News:  दिल्लीतील साकेत न्यायालयाने युट्यूबर ध्रुव राठीला मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने ध्रुव राठीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. 2018 मधील मानहानी प्रकरणात न्यायालयाने हा आदेश दिला आहे. याबाबत विकास सांस्कृत्यायन यांची मानहानीची तक्रार दिली होती, ज्यानंतर आता कोर्टाने ध्रुव राठीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिल्लीच्या  साकेत न्यायालयाने २०१८ च्या मानहानीच्या एका प्रकरणात ध्रुव राठीच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट  केले आहे. तक्रारदार विकास संकृत्यायन यांनी आरोप केला आहे की, ध्रुव राठी यांनी ‘भाजप आयटी सेल भाग २’ नावाचा व्हिडिओ प्रसिद्ध करून त्यांच्यावर खोटे आणि बदनामीकारक आरोप केले आहेत. तक्रारदाराने जर्मनीमध्ये राहणाऱ्या ध्रुव राठी यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती.

Loading...

साकेत न्यायालयाने सोमवारी (२३ नोव्हेंबर) अजामीनपात्र वॉरंट जारी केले. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये,न्यायालयाने ध्रुव राठी यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. नोटीस बजावण्यासाठी पोहोचल्यावर त्यांचे निवासस्थान बंद असल्याचे आढळल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली आहे. मुख्य न्यायाधीश रजेवर असल्याने कर्तव्यावरील दंडाधिकाऱ्यांकडून ही सुनावणी पार पडली. याबाबतची  पुढील सुनावणी ३ डिसेंबरला होणार आहे.

याआधीही ध्रुव राठी विरोधात कोर्टाने समन्स बजावले होते. तो ऑक्टोबर महिन्यामध्ये जर्मनीवरुन कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी भारतात आला होता. बंगळूरमधील एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर, तो आंदोलनात सामील होण्यासाठी १० ऑक्टोबर रोजी दिल्लीत दाखल झाला. मात्र, त्याला गुरुग्राममधील त्याच्या घरी ताब्यात घेण्यात आले. सुमारे २० तासांनंतर पोलिसांनी त्याला सोडल्यावर, त्याने अपहरणाचा आरोप केला. काही दिवसांनंतर, तो अचानक लंडनला निघून गेला.

दरम्यान, तक्रारदार विकास पांडे ‘आय सपोर्ट नरेंद्र मोदी’ नावाचे एक पेज चालवतात. असा आरोप आहे की, युट्युबर ध्रुव राठीने ‘भाजप आयटी सेल भाग २’ नावाच्या आपल्या व्हिडिओमध्ये त्यांच्याविरुद्ध खोटे आणि बदनामीकारक दावे केले आहेत. यापूर्वी, न्यायालयाने ध्रुव राठीला समन्स बजावले होते. याव्यतिरिक्त, त्याच्याविरुद्ध दोन जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us