AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज, 33 विदेशी ब्रँडची दारू झाली स्वस्त, भावात थेट 50 टक्के कपात, वाचा यादी

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी आहे, ती म्हणजे विदेशी मद्याच्या किंमती थेट अर्ध्यावर आल्या आहेत. 33 विदेशी ब्रँडच्या दारूमध्ये 50 टक्के कपात करण्यात आली आहे. ज्यामध्ये अनेक महागाड्या ब्रँडचा समावेश आहे.

मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज, 33 विदेशी ब्रँडची दारू झाली स्वस्त, भावात थेट 50 टक्के कपात, वाचा यादी
विदेशी मद्याच्या दरात 50 टक्क्यांची कपात Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 23, 2026 | 2:21 PM
Share

मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज आहे. भारत आणि ब्रिटनमध्ये झालेल्या मुक्त व्यापार करार अंतर्गत 33 विदेशी मद्याच्या ब्रँडची किंमत थेट अर्ध्यावर आली आहे. स्कॉच, व्हिस्की या सारख्या महागड्या मद्याच्या ब्रँडवरील आयात शुक्ल (Import duty) 150 टक्क्यावरून कमी करून 75 टक्के करण्यात आलं आहे. आयात शुल्क कमी होताच उत्पादन शुल्क विभागाकडून नवी सूची जारी करण्यात आली आहे. छत्तीसगड सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता छत्तीसगडमध्ये महागड्या ब्रँडची दारू थेट अर्ध्या किंमतीमध्ये मिळणार आहे. नवे दर लागू होताच जॉनी वॉकरच्या 18 ईयरच्या एका केसची किंमत जवळपास 5 हजार रुपयांनी कमी झाली आहे.

कोणत्या ब्रँडचे दर कमी झाले?

छत्तीसगड सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये उरलेल्या महिन्यांसाठी जे मद्य थेट विदेशामधूनच बाटलीबंद होऊन भारतामध्ये येते त्यावरील आयात शुक्ल 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एकूण 33 प्रीमियम दारूच्या ब्रँडचा समावेश आहे. यामध्ये जॉनी वॉकर, चिवास रीगल, रॉयल सॅल्यूट, ग्लेनलिवेट, ड्यूअर्स, बॉलेंटाइन आणि सिंगलटन सारख्या 33 ब्रँडचा समावेश आहे.

मुक्त व्यापार कराराअंतर्गत स्कॉच व्हिस्कीवर लावण्यात आलेलं आयात शुल्क 150 टक्क्यांवरून थेट 75 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलं आहे. आयात शुल्कात केलेल्या कपातीचा थेट परिणाम हा 33 विदेशी मद्यांच्या ब्रँडवर झाला आहे. याच आधारावर आता छत्तीसगड सरकारने विदेशी मद्याच्या ब्रँडचे दर देखील कमी केले आहेत. दरांमध्ये थेट 50 टक्के कपात करण्यात आली आहे. भारत आणि ब्रिटनमध्ये झालेल्या या मुक्त व्यापार कराराचा उद्देश व्यापाराला चालना देणं आहे. ज्यामुळे दोन्ही देशांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. याचाच एक भाग म्हणून आयात शुल्क मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आलं आहे.

दरम्यान आयात शुल्क कमी करण्यात आल्यामुळे आता 33 विदेशी मद्यांचे ब्रँड मद्यप्रेमींना अर्ध्या किंमतीमध्ये मिळणार आहेत. यामुळे आता मद्याच्या विक्रीमध्ये देखील मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारच्या वतीने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Follow Us
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू
आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
Rahul Narvekar on Sanjay Raut : आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले...
Rohit Pawar : शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले सरकार...
अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या....
Super Power India : अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या अहवालात भारताचा दबदबा कायम
योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून
Ladki Bahin Yojana : योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून नरहरी झिरवाळांनी मांडली सरकारची अडचण