Asaduddin Owaisi : हॉटेल मालकांना पॅन्ट उतरवायला सांगणारे हे कोण? संतापलेल्या ओवैसींचा सवाल
"लक्ष ठेवणारे हे समूह सरकार चालवत आहे का?. प्रशासनाच काही अस्तित्व उरलेलं नाही का? पोलीस काय करतायत?. जर हे लोक जबरदस्तीने लोकांची ओळख पटवत असतील, तर पोलीस त्यांना अटक का नाही करत?"

दिल्ली-डेहराडून हायवे वर कांवड यात्रेदरम्यान एक वादग्रस्त घटना समोर आली आहे. ढाबा मालकाचा धर्म कुठला? हे जाणून घेण्यासाठी काही लोकांना त्यांची पॅन्ट उतरवायला सांगितली. या घटनेवर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. “ही लाजिरवणी घटना आहे. देशाचं हे प्रशासकीय अपयश असून संविधानाची खुली अवहेलना आहे” असं म्हटलं आहे. मुजफ्फरनगर हायवेजवळ अनेक हॉटेल्स आणि ढाबे अनेक वर्षांपासून सुरु आहेत. अचानक यावर का प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय? असा प्रश्न ओवैसीनी विचारला. “10 वर्षांपूर्वी कांवड यात्रा शांततेत निघायची. त्यावेळी कोणाला ढाब्यापासून प्रॉब्लेम नव्हता. आज हे लोक ढाबा मालकांना पॅन्ट उतरवायला सांगत आहेत. असं सांगणारे हे कोण होतात?” असा प्रश्न ओवैसीनी विचारला.
प्रशासनावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. “लक्ष ठेवणारे हे समूह सरकार चालवत आहे का?. प्रशासनाच काही अस्तित्व उरलेलं नाही का? पोलीस काय करतायत?. जर हे लोक जबरदस्तीने लोकांची ओळख पटवत असतील, तर पोलीस त्यांना अटक का नाही करत?” असे प्रश्न ओवैसी यांनी उपस्थित केले.
उद्या तुम्ही स्टुडिओमध्ये घुसून ओळख विचारणार का?
“हे सर्व विचारपूर्वक रणनिती अंतर्गत केलं जातय. खासकरुन एका वर्गाला टार्गेट केलं जातय. हॉटेलमध्ये जाऊन कोणाचं जबरदस्तीने आधार कार्ड मागत आहेत. पॅन्ट उतरवतायत. हे कायद्याला धरुन नाही. असं करणारे तुम्ही कोण होता?. उद्या तुम्ही स्टुडिओमध्ये घुसून ओळख विचारणार का?” असा सवाल ओवैसी यांनी केला. अशा प्रकरणात सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली.
