AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अबब..! 70 लाख बाटल्यातील दारू ओतून टाकणार; दिल्लीच्या उत्पादन शुल्काने का घेतला असा निर्णय..

अबकारी खात्याकडे या 70 लाख दारुच्या बाटल्या पडून असल्या तरी केजरीवाल सरकारच्या 2021-22 च्या वादग्रस्त मद्य धोरणामुळे त्यांची विक्री करता येणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

अबब..! 70 लाख बाटल्यातील दारू ओतून टाकणार; दिल्लीच्या उत्पादन शुल्काने का घेतला असा निर्णय..
| Updated on: Sep 15, 2022 | 4:49 PM
Share

नवी दिल्लीः दिल्लीतील आप सरकारच्या (AAP Government) दारू घोटाळ्यावरुन (Liquor scam)  प्रचंड वादंग माजले आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच त्यातील वेगवेगळे मुद्दे आता समोर येऊ लागेल आहेत. दिल्लीत 1 सप्टेंबरपासून जुनेच मद्य धोरण लागू केल्यामुळे दिल्लीतील उत्पादन शुल्क विभागाकडे (Excise Department) 70 लाख दारूच्या बाटल्या पडून असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत अबकारी विभागाकडून सध्याच्या धोरणानुसार या बाटल्यांची विक्री किंवा विल्हेवाट लावण्याचा विचार केला जात आह.

अबकारी खात्याकडे ज्या बाटल्या पडून आहेत, त्यातील काही बाटल्या या वाईन आणि बिअरच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दारुच्या 70 लाख बाटल्या

अबकारी खात्याकडे या 70 लाख दारुच्या बाटल्या पडून असल्या तरी केजरीवाल सरकारच्या 2021-22 च्या वादग्रस्त मद्य धोरणामुळे त्यांची विक्री करता येणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

जुने मद्य धोरण लागू

दिल्लीत प्रशासनाकडून 1 सप्टेंबरपासून जुने दारू धोरण लागू केल्यामुळे दिल्लीतील उत्पादन शुल्क विभागाकडे 70 लाख दारूच्या बाटल्या शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता अबकारी विभागाकडून या बाटल्यांची विल्हेवाट किंवा विक्री करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

दारुच्या 35 लाख बाटल्यांची नोंदणी

उत्पादन शुल्क विभागामधील एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे की, सध्याच्या उत्पादन शुल्क धोरणांतर्गत अनेक कंपन्यांच्या 35 लाखांहून अधिक बाटल्या नोंदणीकृत आहेत. त्याच बाटल्यांची विक्री केली जाऊ शकते, मात्र ज्या बाटल्यांची नोंदणी अजूनही झाली नाही त्या बाटल्यांची मात्र विक्री केली जाणार नसल्याचेच सांगण्यात आले आहे.

दारुचे करायचे काय

मद्य धोरण बदलल्यामुळे बाटल्यांची नोंदणी करणे आणि दारू विक्रेत्यांमार्फत विक्री करणे हा पर्याय बाटल्यांच्या नोंदणीनंतर होतो. मात्र आता 70 लाख दारुच्या बाटल्यांची नोंदणी झाली नसल्यामुळे त्या बाटल्यांचा करायचा काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मूळ किमतीपेक्षा 25 टक्के कमी दर

याबाबत एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, या बाटल्या नष्ट करण्याऐवजी त्या विक्री केल्या तरच फायदा होऊ शकणार नाही. उत्पादन शुल्क विभागातील 2019 मधील घटना सांगताना अधिकाऱ्यांनी सांगितले की छाप्यांदरम्यान जप्त केलेल्या दारूच्या बाटल्या त्यानंतर त्या नष्ट केल्या नाहीत. तर त्यांच्या मूळ किमतीपेक्षा 25 टक्के कमी दराने विक्री केली.

1 सप्टेंबरपासून जुनेच मद्य धोरण

अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र त्यांनी 17 नोव्हेंबर 2011 मध्ये नवीन मद्य धोरण 2021-22 लागू केले होत. त्यानंतर भ्रष्टाचाराची तक्रार केली गेल्यानंतत मात्र सरकारने तो निर्णय मागे घेण्याचा विचार केला. त्यामुळे पुन्हा 1 सप्टेंबरपासून जुनेच मद्य धोरण लागू केले गेले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.