Delhi blast first CCTV footage : दिल्ली बॉम्बस्फोटापूर्वीचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज, काळे मास्क घालून कार चालवताना…

Delhi Lal Fort Blast : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट झाल्याने जगात खळबळ उडाली. या स्फोटाबद्दल धक्कादायक माहिती पुढे येताना दिसतंय. प्राथमिक माहितीनुसार, हा मोठा कट असल्याचे सिद्ध होताना दिसतंय. त्यामध्येच एक सीसीटीव्ही पुढे आले.

Delhi blast first CCTV footage : दिल्ली बॉम्बस्फोटापूर्वीचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज, काळे मास्क घालून कार चालवताना...
Delhi Lal Fort Blast CCTV
| Updated on: Nov 11, 2025 | 8:26 AM

दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे एकूण 9 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटाबद्दल अत्यंत धक्कादायक आणि हैराण करणारी माहिती पुढे येतंय. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्फोटाची ही माहिती मिळताच मुंबईसह पुण्यातही अलर्ट जारी करण्यात आला. हा स्फोट नसून दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट होतंय. तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा शोध घेतला जातोय. आता स्फोटापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामुळे एक व्यक्ती तोंडाला मास्क लावून कार गर्दीमधून घेऊन जाताना दिसतोय. गर्दीमधून स्फोटकांनी भरलेली कार घेऊन जाणारा मास्क लावलेला व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून दहशतवादी मोहम्मद उमर असल्याचे स्पष्ट होतंय.

हे फुटेज स्फोटाच्या तपासात एक महत्त्वाचा दुवा ठरू शकते. सुरूवातील हा फक्त गाडीचा स्फोट वाटला. मात्र, येणारी माहिती देशाला हदरवणारी नक्कीच आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते की, त्यावेळी एक पांढऱ्या रंगाची I-20 कार त्या परिसरातून जात होती.रस्ता खूप वर्दळीचा असताना कार गर्दीतून हळू जात असताना गाडीच्या सीटवर बसलेली व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, कार चालवणाऱ्या व्यक्तीने तोंडावर काळा रंगाचे मास्क लावले आहे.

तपास यंत्रणा आता या कारची आणि मास्क घातलेल्या चालकाची ओळख पटविण्यासाठी तांत्रिक गोष्टीची मदत घेत आहेत. ज्या I-20 कारमध्ये स्फोट झाला ती मोहम्मद सलमान याची होती. मात्र, त्याने नदीमला विकली होती. त्यानंतर ती फरीदाबादमधील कार विक्रेता रॉयल कार झोनला विकण्यात आली. त्यानंतर ही कार तारीकने खरेदी केली. तपास यंत्रणांकडून सर्व माहिती घेतली जात आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना सत्य बाहेर काढायचे आहे.

सुरूवातीच्या तपासात हा हल्ला आत्मघातकी पद्धतीचा असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही कार जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी तारिकने खरेदी केली होती. फरिदाबाद येथील दहशतवादी मॉड्यूलशी त्याचे संबंध आहेत का याचा तपास सुरू आहे. मात्र, प्राथमिक माहितीनुसार, ही मोठा कट दिसतोय. लाल किल्ल्याजवळ गर्दी असल्याचे ते ठिकाणी निवडले.