
Delhi Red Fort Blast : राजधानी दिल्लीत सोमवारी संध्याकाळी 7च्या सुमारास भीषण स्फोट (Delhi Blast) झाला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ एका कारमध्ये हा स्फोट झाला. स्फोटानंतर कारला आग लागली आणि जवळच उभ्या असलेल्या एक-दोन कारनाही आग लागली. त्याच 9 जणांनी जीव गमावला तर अनेक जण जखमी झालेत. या स्फोटनंतर अनेक अपडेट्स समोर येत असून कसून तपास करण्यात येत आहे. स्फोटापूर्वी ही कार 3 तास आधीच त्या जागी उभी होती अशी माहिती समोर येत आहे, तर कालचालकाचा एक संदिग्ध फोटोही समोर आला आहे. दरम्यान याधीही राजधानी दिल्लीत अनेकवेळा स्फोट झाले असून अनेक निरपराध लोकांना जीव गमवावा लागला आहे.
दिल्लीत कधी झाले होते स्फोट जाणून घेऊया.
25 मे 1996 : लाजपत नगर सेंट्रल मार्केट मध्ये स्फोट – 16 जणांचा मृत्यू
1 ऑक्टोबर 1997: सदर बाजारजवळ 2 स्फोट – 30 जखमी
10 ऑक्टोबर 1997: शांतिवन, कौड़िया पुल तसेच किंग्सवे कँप जवळ 3 स्फोट – 1 ठार , 16 जखमी
18 ऑक्टोबर 1997: रानी बाग मार्केटमध्ये दुहेरी स्फोट- 1 ठार 23 जखमी
26 ऑक्टोबर 1997: करोल बाग मार्केट मध्ये 2 स्फोट – 1 ठार, 34 जण जखमी
30 नोव्हेंबर 1997: लाल किल्ला परिसरात दुहेरी स्फोट – ३ जण ठार, ७० जण जखमी.
30 डिसेंबर 1997: पंजाबी बागेजवळ बसमध्ये स्फोट – ४ जण ठार, ३० जण जखमी.
16 मार्च 2000: सदर बाजारात स्फोट – ७ जण जखमी.
27 फेब्रुवारी 2000- : पहाडगंजमध्ये स्फोट – ८ जण जखमी.
18 जून 2000 : लाल किल्ल्याजवळ दोन स्फोट – 2 जण ठार, 12 जण जखमी.
22 मे 2005 : लिबर्टी आणि सत्यम सिनेमागृहात दोन स्फोट – 1 जण ठार, 60 जण जखमी.
29 ऑक्टोबर 2005 : सरोजिनी नगर, पहाडगंज आणि गोविंदपुरी येथे दोन स्फोट – अंदाजे 59 ते 62 लोक ठार, 100 + जखमी
14 एप्रिल 2006 : जामा मशिदीत दोन स्फोट – 14 जण जखमी.
13 सप्टेंबर 2008 : करोल बाग (गफ्फार मार्केट), कॅनॉट प्लेस आणि ग्रेटर कैलास-1 येथे पाच स्फोट – 20-30 जणांचा मृत्यू, 90+ जखमी.
27 सप्टेंबर 2008: मेहरौली फ्लॉवर मार्केट (सराई) येथे स्फोट – ३ जणांचा मृत्यू, २३ जण जखमी.
25 मे 2011: दिल्ली उच्च न्यायालयाच्या पार्किंगमध्ये स्फोट – कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हे असे स्फोट आहेत ज्यांनी एकेकाळी राजधानी दिल्ली हादरवून टाकली होती. त्यात अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि अनेक जण जखमी झाले. तर काल दिल्लीत पुन्हा स्फोटामुळे दिल्लीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा स्फोट लाल किल्ल्यापासून फक्त 500 मीटर अंतरावर झाला, जो बहुतेकदा खूप वर्दळीचा असतो. तिथे सुरक्षाही असते. तरीही हा स्फोट झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत