आता पुन्ही तीच भीती सतावतेय, 10 वर्षांनंतर नोटबंदीचे संकट पुन्हा येणार? मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंच्या विधानाची चर्चा
नोटबंदीला आता दहा वर्षे उलटल्यानंतर पुन्हा एकदा तसंच काहीसे होणार असल्याचे दिसत आहे. पुन्हा एकदा नोटबंदी होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रकांत नायडू यांनी असं विधान केले आहे.

Demonetization News: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय आणि आर्थिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. सोमवारी, त्यांनी ५०० आणि २००० रुपयांच्या मोठ्या नोटा पूर्णपणे बंद करण्याची जोरदार मागणी केली. त्यांचा दावा आहे की, जर मोठ्या प्रमाणात होणारे रोख व्यवहार थांबवले, तर देशातून भ्रष्टाचार नष्ट करता येईल आणि गरिबीचे निर्मूलन करणे अधिक सोपे होईल.
डिजिटल पेमेंट आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याचे समर्थन करताना, मुख्यमंत्री नायडू म्हणाले की, “मी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला होता आणि आता ते आपल्या मागणीचा पुर्नविचार करत आहेत. डिजिटल चलन अहवालासाठी सूचना मीच केल्या होत्या. मी यापूर्वी पंतप्रधानांना त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले होते आणि आज पुन्हा तीच मागणी करत आहे. ५००, १००० आणि २००० रुपयांच्या नोटा पूर्णपणे बंद केल्या पाहिजेत. फक्त १०० आणि २०० रुपयांच्या लहान नोटा चलनात राहिल्या पाहिजेत.”
विशेष म्हणजे, नायडू यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा २०१६ च्या ऐतिहासिक नोटाबंदीला १० वर्षे पूर्ण होत आहेत. काळा पैसा, बनावट चलन आणि भ्रष्टाचार संपवण्याच्या उद्देशाने, केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रातोरात रद्द केल्या होत्या.
टीडीपी प्रमुख म्हणाले की, “व्यवस्थेतील त्रुटींमुळे भ्रष्टाचार हे एक असे दुष्टचक्र बनले आहे, ज्यातून बाहेर पडणे कठीण आहे. बऱ्याच काळापासून या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी काम करत आहेत.”
नायडू यांनी दावा केला, “जर तंत्रज्ञानाची योग्य अंमलबजावणी केली, तर देशात संपत्ती निर्मिती आणि गरिबी निर्मूलन दोन्हीही अवघड राहणार नाही. माझा विश्वास आहे की डिजिटल चलन हेच भविष्य आहे. निवडणुका पैशाच्या जोरावर नव्हे, तर समाजसेवेच्या भावनेने लढल्या पाहिजेत. मी निवडणुकीदरम्यान होणाऱ्या पैशांच्या अंदाधुंद वाटपाचा तीव्र शब्दांत निषेध करतो. “