
बद्रीनाथाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा टेम्पो ट्रॅव्हलर उत्तराखंडातील रुद्रप्रयाग येथे चालकाचे नियंत्रण चुकल्याने दरीत कोसळून 8 ठार तर 7 जण जखमी झाल्याचे घटना घडली आहे. या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये 23 भाविक बसले होते. नोएडातून हे भाविक बंद्रीनाथाच्या दर्शनासाठी निघाले होते. श्रीनगर येथून बद्रीनाथ महामार्गावरुनव जात असताना रुद्रप्रयाग येथे हा टेम्पो ट्रॅव्हलर महामार्गाच्या कडेला असलेल्या खोलीत दरीत कोसळून हा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश उत्तराखंडचे मुख्ममंत्र्यांनी दिले आहेत.
बद्रीनाथला जाणार टेम्पो ट्रॅव्हलरला मोठा अपघात झाला आहे. या अपघातचे वृत्त समजताच रेक्स्यु टीम घटनास्थळी दाखल झाली. या टीमने मोठ्या मह्तप्रयासाने या अपघातग्रस्त वाहनातून भाविकांचा सुटका केली. यातील जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या भीषण अपघाताचे वृत्त कळताच शोक व्यक्त केला आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना नेण्यासाठी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
नोएडाहून निघालेली टेम्पो ट्रॅव्हलर श्रीनगरहून चपाट्याच्या दिशेने निघाली होती. भाविकांचे वाहन बद्रीनाथ महामार्गावरील रुद्रप्रयागजवळून जात असताना अचानक चालकांचे नियंत्रण चुकल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत हे वाहन कोसळले. प्रवासी खाली पडताच आत बसलेल्या प्रवाशांनी मदतीसाठी धावा सुरु केला. प्रवाशांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक बसले होते. हा अपघात एवढा भीषण होता की जखमींच्या अवयवांचे मोठे नुकसान झाले असून अनेक लोक वाहनात अडकून पडले. बचाव पथकाने त्यांना मोठ्या मुश्किलीने कसेतरी बाहेर काढले आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.