AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र प्रधान पुन्हा एक्शन मोडमध्ये, राजीनामा देताच… काँग्रेसचा बडा नेता टार्गेटवर

Dharmendra Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज ते प्रथमच संसदेत पोहोचले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याला सुनावलं आहे.

धर्मेंद्र प्रधान पुन्हा एक्शन मोडमध्ये, राजीनामा देताच... काँग्रेसचा बडा नेता टार्गेटवर
Dharmendra Pradhan on Jairam RameshImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 27, 2026 | 5:32 PM
Share

देशाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. नीट पेपर लीक प्रकरणात विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर आज प्रथमच संसदेत पोहोचले. यावेळी भाजप आणि एनडीएच्या खासदारांनी त्यांचे भव्य स्वागत करत त्यांना पगडी घालत संसद भवनात नेले. यावेली काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी प्रधान यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी प्रधान यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

संसद भवन परिसरात काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी प्रधान यांच्याशी सहानुभूती व्यक्त करत, ‘असं होत असतं’ असं म्हटलं. त्यावर धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ उत्तर दिलं, “काहीच झालेलं नाही”. त्यानंतर त्यांनी पुढे म्हटले की ‘मी रस्त्यावर संघर्ष करणारा नेता आहे, एसी रूममध्ये बसून आंदोलन करणारा कार्यकर्ता नाही’. प्रधान यांच्या राजकीय भवितव्याबाबत विविध तर्क-वितर्क सुरू असतानाच त्यांनी विरोधकांना हे प्रत्युत्तर दिले आहे.

पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी मिळण्याची चर्चा

मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांना पक्ष संघटनेत महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी त्यांच्याकडे प्रचार मोहिमेचे नेतृत्व दिले जाऊ शकते. प्रधान यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, प्रधान यांनी देशहितासाठी आपल्या पदाचा त्याग केला आहे. त्यामुळे जनतेमध्ये आणि त्यांच्या संबलपूर मतदारसंघात त्यांची प्रतिमा अधिक मजबूत होईल.’

शनिवारी X वर पोस्ट केलेल्या निवेदनात धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले होते, ‘गेल्या दहा दिवसांत घडलेल्या घटनांमुळे मला दुःख झाले आहे. हा माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न नाही. भारताची युवा शक्ती हीच देशाची खरी ताकद आहे. देशातील तरुणांना संभ्रमाच्या दुष्टचक्रात अडकू देणार नाही, हा माझा निर्धार आहे.”

धर्मेंद्र प्रधान याचे पक्षासाठी योगदान

धर्मेंद्र प्रधान हे ओडिशातील भाजपचे आघाडीचे नेते असून राष्ट्रीय राजकारणातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रभारी म्हणून काम केले होते. तसेच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी यांच्या विरोधात सुवेंदू अधिकारी यांच्या विजयातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा