AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP वादात; भाजप नेत्याकडून ‘तो’ व्हिडिओ पोस्ट, VIDEO

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP वादात सापडली आहे. भाजप नेत्याकडून आंदोलकांचा जल्लोष करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP वादात; भाजप नेत्याकडून 'तो' व्हिडिओ पोस्ट, VIDEO
| Updated on: Jul 27, 2026 | 1:15 PM
Share

भाजप खासदार धर्मेंद्र प्रधान यांना कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनासमोर झुकावं लागलं. महिनाभराच्या आंदोलनानंतर प्रधान हे केंद्रीय शिक्षणमंत्रिपदावरून पायउतार झाले. 12 वर्षांच्या काळात पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील पहिल्या नेत्याने मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलनाचं लोण संपूर्ण देशभर पसरलं होतं. त्यामुळे सरकारने आंदोलक तरुणांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांनी एका हॉटेलमध्ये आंनद व्यक्त केला. आंदोलकांचा नाचतानाचा व्हिडिओ शेअर करत भारतीय जनता पक्षाचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, प्रत्येक व्यक्तीला मेहनत केल्यानंतर आराम करणे आणि आनंद, जल्लोष व्यक्त करण्याचा अधिकार आहे. परंतु जल्लोष व्यक्त करण्याची वेळ आणि ठिकाण महत्त्वाचं असतं’. त्यांनी पुढे म्हटलं की, ‘कोणतेही आंदोलन हे न्यायाची लढाई म्हणून लोकांसमोर सादर केले जाते. जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांनी आंदोलन हे नीट पेपरफुटीनंतर 21 जणांनी आत्महत्या केल्याने पुकारलं होतं. परंतु या आंदोलनानंतर आंदोलकांचा नाचणे आणि जल्लोषाचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यांचा व्हायरल होणारा व्हिडिओ असंवेदनशील आहे. 21 जणांच्या आत्महत्या प्रकरणी काही जण दु:ख व्यक्त करत आहे. दुसरीकडे काही जण जल्लोष करत आहेत’.

भाजप नेत्याने पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, ‘काही दिवसांपूर्वी मंचावरून विजेता दहिया यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता अभिजीत दीपके यांच्या ग्रुपमधील सौरव, रांका आणि इतर सदस्य जल्लोष करताना दिसत आहेत. त्यांचा जल्लोष करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावरून व्हायरल होत आहे.

‘या व्हायरल व्हिडिओनंतर हजारो तरुणांमध्ये काय संदेश जाईल. आंदोलनात अनेक जण शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावी, यासाठी सहभाग नोंदवला होता. आता आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांना दिशाभूल करण्यात आल्याची समजून येईल. विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारे आंदोलक हे आंदोलन संपल्यानंतर आनंद व्यक्त करत नाचगाणी करत आहेत. या आंदोलनात प्रामाणिकपणे सहभागी झालेल्या आंदोलकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या भावनांचा वापर हा राजकीय प्रचारासाठी केला जात आहे, असा प्रश्न विचारण्याचा हक्क आहे, असेही मालवीय यांनी म्हटलं.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?