राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला धीरेंद्र शास्त्री, फोटो व्हायरल, राऊतांची थेट पोस्ट..
धीरेंद्र शास्त्री यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रपतींसोबत नक्की काय चर्चा झाली हे देखील सांगितले. त्यांच्या भेटीचे फोटो पुढे आली आहेत. यासोबत कन्या विवाह महोत्सवाचे आमंत्रण राष्ट्रपतींना देण्यात आले.

बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी दिल्लीत राष्ट्रपती भवनाला भेट दिली. यावेळी त्यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाल्याचीही माहिती मिळतंय. द्रौपदी मुर्मू यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो धीरेंद्र शास्त्री यांनी सोशल मीडियावर शेअर केले. या भेटीनंतर खासदार संजय राऊत यांनीही एक पोस्ट शेअर केली. आपण द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी प्रबोधनकार ठाकरेंचे पुस्तक भेट म्हणून पाठव्याचे त्यांनी म्हटले. द्रौपदी मुर्मू यांच्यासोबतच्या भेटीनंतर धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले की, भारताच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत भेट झाली. राष्ट्रपती भवनात आयोजित या भेटीदरम्यान धीरेंद्र शास्त्रींनी राष्ट्रपतींना आगामी देशव्यापी युवा जागरण अभियानाबाबत माहिती दिल्याचे धीरेंद्र शास्त्री यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले.
जेनझींना देशाच्या उभारणीच्या कामात गुंतवणार असल्याचे त्यांनी म्हटले. धीरेंद्र शास्त्री यांनी राष्ट्रपतींना कन्या विवाह महोत्सवाचे आमंत्रण देखील दिले. यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी राष्ट्रपतींना छत्रसाल महाराजांना एक फोटोही दिला. नक्की काय चर्चा या भेटीत झाली, हे धीरेंद्र शास्त्री यांनी स्पष्ट केले. जेनझींबद्दलही या भेटीत चर्चा झाल्याचे बघायला मिळतंय.
भारत की प्रथम नागरिक राष्ट्रपति माननीया द्रौपदी मुर्मू के संग पूज्य सरकार की आत्मीय भेट…दिल्ली के राष्ट्रपति भवन में आयोजित इस भेंटवार्ता के दौरान पूज्य सरकार द्वारा भारत की माननीया राष्ट्रपति जी को आगामी दिनों में प्रारंभ किए जा रहे राष्ट्रव्यापी युवा जागरण अभियान की जानकारी से… pic.twitter.com/00iptOZXpg
— Bageshwar Dham Sarkar (Official) (@bageshwardham) August 20, 2026
या भेटीवर संजय राऊत यांनी पोस्ट शेअर केली. संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आपल्या महान राष्ट्रपती महोदयांनी परमात्मा धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतली व अनेक राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा केली. देश आगे जा रहा है.. राष्ट्रपती महोदयाना मी प्रबोधनकार ठाकरे यांचे देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे हे क्रांतिकारी पुस्तक भेट म्हणून पाठवले आहे..
आपल्या महान राष्ट्रपती महोदयांनी
परमात्मा धिरेंद्र शास्त्री यांची भेट घेतली व अनेक राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा केली!
देश आगे जा रहा है
राष्ट्रपती महोदयाना मी प्रबोधनकार ठाकरे यांचे “ देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे “ हे क्रांतिकारी पुस्तक भेट म्हणून पाठवले आहे! pic.twitter.com/ux2eTEXpSM— Sanjay Raut (@rautsanjay61) August 21, 2026
हे पुस्तक समाजसुधारक व लेखक प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या सोशल मीडियावरून शेअर करण्यात आलेली ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. कन्या विवाह महोत्सवाचे आमंत्रण राष्ट्रपतींना देण्यात आले. आता महोत्सवाला राष्ट्रपती उपस्थित राहतात का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.