Rahul Gandhi: तीन महिन्यांच्या गरोदर महिला पत्रकाराला राहुल गांधी यांचा धक्का? भाजपचा आरोप, नेमकं घडलं तरी काय?

BJP Allegation on Rahul Gandhi: भाजप नेत्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप लावला आहे. एका तीन महिन्यांच्या गर्भवती महिला पत्रकाराला आंदोलनादरम्यान त्यांनी धक्का दिल्याचा आरोप आहे.

Rahul Gandhi: तीन महिन्यांच्या गरोदर महिला पत्रकाराला राहुल गांधी यांचा धक्का? भाजपचा आरोप, नेमकं घडलं तरी काय?
गरोदर महिला पत्रकाराला राहुल गांधी यांचा धक्का? भाजपचा आरोप काय?
| Updated on: Oct 13, 2026 | 11:21 AM

BJP Allegation on Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर भाजप नेत्यांनी गंभीर आरोप केला आहे. एका तीन महिन्यांच्या गर्भवती महिला पत्रकाराला राहुल गांधी यांनी धक्का दिल्याचा हा आरोप आहे. SIR विरोधातील आंदोलनादरम्यान धक्का देणे आणि असभ्य वागणूक देण्याचा ठपका भाजपने ठेवला आहे. ही महिला पत्रकार धक्क्याने खाली पडली आणि जखमी झाली. तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.

उमंग बजाज यांचा आरोप काय?

Loading...

भाजपचे आमदार उमंग बजाज यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरही नाराजी व्यक्त केली. या महिला पत्रकाराची अवस्था पाहिली तर राहुल गांधी यांनी अत्यंत लाजीरवाणे काम केले असेच म्हणावे लागेल असे बजाज म्हणाले. जी व्यक्ती पितृसत्ताक व्यवस्था तोडण्याची भाषा करते, तीच व्यक्ती एका महिला पत्रकारसोबत अशी वागते यावर विश्वास बसत नसल्याचे ते म्हणाले. ती महिला पत्रकार तिचे काम करत होती असे सांगत त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला.

भाजप नेत्यांनी महिला पत्रकाराला रुग्णालयात भर्ती केले

भाजप आमदार उमंग बजाज यांनी सांगितले की, रात्री 10:00 वाजता त्यांना माहिती मिळाली की, महिला पत्रकार ऋचा पाराशर यांच्यासोबत ही घटना घडली. त्यांनी तातडीने भाजप नेते प्रदीप भंडारी, राजेश भाटिया आणि स्थानिक नेत्यांना मदतीला पाठवले. त्यांनी या महिला पत्रकाराची विचारपूस केली आणि तिला नजीकच्या रुग्णालयात भरती केले. लोकप्रतिनिधीने महिला पत्रकाराला उत्तर देणे अपेक्षित होते. पण त्यांनी तिला धक्का देत जमिनीवर पाडले. राहुल गांधी यांची ही कृती लाजिरवाणी असल्याचा दावा त्यांनी केला. केवळ गप्पा मारून मनं जिंकली जात नाही, तर कृतीही महत्त्वाची असल्याचे बजाज म्हणाले.

पत्रकाराचा राहुल गांधी यांच्यावर आरोप काय?

भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी या महिला पत्रकाराची विचारपूस केली आणि यासंबंधीचा व्हिडिओ रुग्णालयातून त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट केला. या महिला पत्रकाराने आरोप केला आहे की राहुल गांधी यांना त्यांना धक्का दिला. त्यामुळे ती जमिनीवर कोसळली आणि तिला गंभीर जखमी झाली. महिला पत्रकाराच्या आरोपानुसार, तिच्या कॅमेरामनला सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us