Jyotiraditya Scindia Property : 40 हजार कोटींचा वाद, आत्यांचा संपत्तीवर दावा, भाजपमध्ये गेल्याने ज्योतिरादित्य शिंदेंचं टेन्शन वाढलं?

केंद्र सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे ( Jyotiraditya Scindia Shinde) यांच्या घराण्याच्या तब्बल 40 हजार कोटींच्या संपत्तीत वाद ( assets worth Rs 4,0000 crore  ) सुरु झाला आहे. या वाद सध्या कोर्टात गेला आहे, आणि हा वाद निर्माण करण्यात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या 3 आत्या कारणीभूत आहेत.

Jyotiraditya Scindia Property : 40 हजार कोटींचा वाद, आत्यांचा संपत्तीवर दावा, भाजपमध्ये गेल्याने ज्योतिरादित्य शिंदेंचं टेन्शन वाढलं?
jyotiraditya Shinde
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 11:00 PM

जयपूर: केंद्र सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे ( Jyotiraditya Scindia Shinde) यांच्या घराण्याच्या तब्बल 40 हजार कोटींच्या संपत्तीत वाद ( assets worth Rs 4,0000 crore  ) सुरु झाला आहे. या वाद सध्या कोर्टात गेला आहे, आणि हा वाद निर्माण करण्यात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या 3 आत्या कारणीभूत आहेत. या 3 आत्या आहेत राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे ( Vasundhara Raje), नेपाळच्या राजघराण्यातील उषाराजे शिंदे ( Usharaje Shinde ) आणि सर्वात लहान आत्या यशोधरा राजे शिंदे. ( Yashodhara Raje Shinde ) हे प्रकरण कोर्टाबाहेर मिटवण्याचे प्रयत्न सुरु होते, मात्र अखेर यशोधरा राजे शिंदे यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावलाच. ( Dispute in court over assets worth Rs 4,0000 crore in Jyotiraditya Shinde’s royal family )

उषाराजे शिंदेंना हवा आहे संपत्तीत वाटा!

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सर्वात लहान आत्या उषाराजे शिंदे यांना संपत्तीत आपला हिस्सा हवा आहे. त्या संपत्तीवरुन आपला वारसा हक्क सोडायला तयार नाहीत. शिंदे घराण्याकडे शेकडो कोटींची संपत्ती आहे, गेल्या कित्येक वर्षापासून हा वाद सुरु आहे. पण हा वाद घरापुरताच मर्यादित होता, तो वाद कधीही चव्हाट्यावर आला नाही. या वाद मिटवण्यासाठी या तिन्ही बहिणी वर्क आउट सेटलमेंट करण्यासही तयार झाल्या होत्या. मात्र, कोर्टाबाहेर या वादाचा अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. ज्योतिरादित्य केंद्रात मंत्री झाल्यानंतर हा वाद मिटेल अशी आशा होती, मात्र हा वाद काही मिटला नाही आणि शेवटी शिंदे कुटुंब कोर्टात गेलं.

शिंदे राजघराण्याची संपत्ती किती?

शिंदे घराण्याची संपत्ती मोजता येणार नाही इतकी असल्याचं बोललं जातं. मात्र 1957 पासून आतापर्यंत शिंदे घराणं राजकारणात असल्याने, निवडणुकीवेळी शपथपत्रात त्यांनी काही संपत्तीला उल्लेख केला आहे. ज्योतिरादित्य शिंदेनी निवडणूक अर्जात 2 अब्ज रुपयाहून जास्तीची संपत्ती असल्याचा उल्लेख केला होता. ही संपत्ती ज्योतिरादित्य यांची आहे, त्यात कुठलाही वाद नाही. मात्र, ज्या संपत्तीवरुन कोर्टात वाद आहे, ती संपत्ती अंदाजे तब्बल 40 हजार कोटी रुपयांची असल्याची माहिती आहे. यामध्ये शिंदे घराण्याचा जयविलास पॅलेस ज्यात 400 खोल्या आहेत आणि 560 किलो सोन्यानं मढवलेलं छतंही आहे. अशा शेकडो कोटींच्या संपत्ती शिंदे राजघराण्याकडे असल्याचं कळतं.

कोण आहेत उषाराजे, वसुंधराराजे आणि यशोधरराजे शिंदे

ज्योतिरादित्य यांच्या मोठ्या आत्या उषाराजे यांचा विवाह नेपाळच्या राजघराण्यात झाला. त्यामुळे त्या या वादात फारसं लक्ष घालत नाही. नेपाळच्या राजघराण्याचीही संपत्ती प्रचंड असल्याने, त्या या वादाला महत्त्व देत नाहीत. सध्या उषाराजे नेपाळमध्येच स्थायिक आहे, मात्र कधीतरी त्या ग्वाल्हेरला येत असतात. दुसरीकडे वसुंधराराजे ह्या राजस्थानच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत. त्या धौलपूरच्या राजमाता आहेत. त्यांच्या कुटुंबाकडेही प्रचंड संपत्ती आहे, वसुंधरा यांना एक मुलगा आहे, ज्याचं नाव दुष्यंत. तर ज्योतिरादित्य यांच्या तिसऱ्या आत्या आहेत यशोधरराजे शिंदे, त्या मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री आहे. प्रेमविवाह केल्यानंतर त्या परदेशात स्थायिक झाल्या होत्या. मात्र, त्यांचा विवाह जास्तकाळ टिकला नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर त्या भारतात आल्या. आणि मध्य प्रदेशच्या राजकारणात सक्रीय झाल्या. यशोधराराजे यांनीच संपत्तीची लवकर वाटणी व्हावी हा आग्रह लावून धरल्याचं कळतं.

राजमाता विजयाराजे यांच्या मृत्यूपत्रामुळे गोंधळ

शिंदे कुटुबांतील वादाची ठिगणी पडली राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या मृत्यपत्रामुळे. त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात माधवराव आणि नातू ज्योतिरादित्य शिंदे यांना आपल्या संपत्तीतून बेदखल केलं होतं. विजयाराजे आणि माधवराव यांचा वाद असल्यानं त्यांनी हे केलं. त्यानंतर माधवराव आणि ज्योतिरादित्य शिंदे कोर्टात गेले. जो वाद आतापर्यंत सुरु आहे. त्यातच विजयाराजेंनी संपत्तीतील एक हिस्सा आपल्या मुली उषाराजे, वसुंधराराजे आणि यशोधराराजे यांना देण्याचं सांगितलं. आता याच हिस्सावरुन वाद सुरु आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.