बर्ड फ्लूमुळे व्यावसायिकांचे नुकसान, कोंबड्यांच्या आयात निर्यातीवर बंदी घालू नका; केंद्र सरकारचे आवाहन

| Updated on: Jan 14, 2021 | 7:07 AM

केंद्राच्या मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाने (MFAHD) कोंबड्या आणि इतर उत्पादनांवर (import and export of chickens) बंदी न घालण्याचे आवाहन केले आहे.

बर्ड फ्लूमुळे व्यावसायिकांचे नुकसान, कोंबड्यांच्या आयात निर्यातीवर बंदी घालू नका; केंद्र सरकारचे आवाहन
Follow us on

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील इतर 10 राज्यांमध्ये बर्ड फ्लू या आजारामुळे अनेक पक्षी मरण पावले आहेत. त्यानंतर यातील अनेक राज्यांनी कोंबड्या आणि कुक्कुटपालनांतर्गत निर्मिती केलेल्या इतर उत्पादनांवर बंदी घातली आहे. मात्र, केंद्राच्या मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाने (MFAHD) कोंबड्यांची आयात-निर्यात आणि इतर उत्पादनांवर (import and export of chickens) बंदी न घालण्याचे आवाहन केले आहे. आयात निर्यात प्रभावित झाली तर कुक्कुटपालन व्यायसायिकांचे आर्थिक नुकसान होईल त्यामुळे पुरवठ्यावर कोणताही परिणाम न होण्यासाठी राज्यांनी बंदी घालू नये असं केंद्राने म्हटलंय. (do not ban import and export of chickens Appealed Central Government)

व्यवसायावर नकारात्मक प्रभाव पडेल

“बर्ड फ्लूमुळे अनेक राज्यांमध्ये कोंबड्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमुळे कुक्कुटपालन व्यवसायावर नकारात्मक प्रभाव पडेल. सध्या जी स्थिती निर्माण झाली आहे; तिच्याशी दोन हात करण्यासाठी राज्यांनी आरोग्य आणि वनविभागासोबत समन्वय ठेवावा,” असं केंद्रीय मत्स्य, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाने म्हटलंय. तसेच, या मुद्द्यावर संवेदनशीलता दाखवून बंदीच्या निर्णयावर पुन्हा एकाद विचार करण्याचेही आवाहन केंद्र सरकारने केले आहे.

मध्ये प्रदेशात कुक्कुटपालनावर प्रभाव

वाढत्या केसेस आणि बर्ड फ्लू या आजारासंबधी लोकांचा गैरसमज या दोन्ही गोष्टींमुळे मध्य प्रदेशात कुक्कुटपालन व्यवसायावर 75 टक्के प्रभाव पडला आहे. कोंबड्या मरण्यामुळे व्यावसायिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र, भीतीपोटी नागरिकांनी कोंबड्यांचे मांस खाणे सोडून दिल्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांमधील गैरसमज, अफवा या सर्व गोष्टींमुळे कुक्कुटपालन व्यवसायावर 75 टक्के प्रभाव पडला आहे.

महाराष्ट्रात 5 जिल्ह्यांमध्ये संसर्ग

महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला आहे. रत्नागिरी, बीड, परभणी, मुंबई, ठाणे या पाच जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूमुळे हजारो पक्षी मरण पावल्या आहेत. मात्र, त्यामुळे बर्ड फ्लूच्या भीतीने लोकांनी चिकन आणि अंडी खाणं बंद केलंय. मागणीच घटल्यामुळे अंडी आणि चिकनचे भाव घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं आणि कुक्कुटपालन व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्यावर संकट ओढवलं आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्ल्यू नाही तिथेही लोक चिकन-अंडी खरेदी करणं टाळत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांबरोबरच कुकटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचाही व्यवसाय अडचणीत सापडलाय.

संबंधित बातम्या :

राज्यात बर्ड फ्लूच्या अफवेने शेतकऱ्यावर संकट, पोल्ट्री व्यावसायिकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ

Bird Flu | परभणीत 8 हजार, महाराष्ट्रात 80 हजार कोंबड्या स्वाहा केल्या जाणार, मराठवाडा बर्ड फ्लूचं केंद्र

Bird Flu | दिल्लीनंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात बर्ड फ्लू, 9 राज्यांत संसर्ग

(do not ban import and export of chickens Appealed Central Government)