Bird Flu | दिल्लीनंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात बर्ड फ्लू, 9 राज्यांत संसर्ग

या नऊ राज्यांमध्ये महाराष्ट्रसह दिल्ली, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गुजरात, उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे.

Bird Flu | दिल्लीनंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात बर्ड फ्लू, 9 राज्यांत संसर्ग

नवी दिल्ली : जीवघेण्या कोरोना विषाणूने आधीच देशाला हैराण करुन सोडलं आहे (Bird Flu in India). त्यात आता बर्ड फ्लू या आजाराचा धोका वाढत चालला आहे. आतापर्यंत नऊ राज्यांमध्ये बर्ड फ्लू पसरला असल्याची माहिती आहे. याचं गांभीर्य लक्षात घेता आता राज्यांनी खबरदारी बाळगण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये पक्ष्यांना मारणे, बर्ड सेंच्युरीज बंद करण्याच्या आदेशांचा समावेश आहे (Bird Flu in India).

या नऊ राज्यांमध्ये महाराष्ट्रसह दिल्ली, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गुजरात, उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. दिल्लीतही कावळे मृतावस्थेत आढळून आले. सध्या या पक्ष्यांचे नमुणे चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात मरुंबा गावात 800 कोंबड्यांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मुंबई, ठाणे, परभणी, दापोली आणि बीडसारख्या भागामध्ये गिधाड, बगळे, कावळे, पोपट, कोंबड्यांचा अचानकपणे मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत. तर 3 दिवसांपूर्वी मुरुंबा येथे 800 कोंबड्या मरण पावल्या होत्या. परभणी जिल्ह्यातील मरुंबा गावात 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे समोर आले आहे.

हिमाचल प्रदेशात बर्ड फ्लूमुळे 4 हजार पेक्षा जास्त पक्षांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशात रविवारी पोंग धरण तलावात 215 पक्षी मृतावस्थेत आढळून आले होते. आतापर्यंत 4,235 पक्षी असे आहेत ज्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचा संशय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागात कावळे मृतावस्थेत आढळून येत असल्याची माहिती आहे.

कानपूरमध्ये पक्ष्यांना मारण्याचे आदेश

उत्तर प्रदेशात बर्ड फ्लूचा धोका पाहता सर्व खबरदारी घेतली जात आहे. बर्ड सेंच्यूरीजला बंद करण्यात आलं आहे. जेणेकरुन लोक पक्ष्यांच्या जवळ जाऊ नये. कानपूरच्या प्राणीसंग्रहालयमध्ये दोन जंगली पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. या दोघांचाही मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं स्पष्ट झालं होतं (Bird Flu in India).

बर्ड फ्लूच्या दहशतीमुळे उत्तर प्रदेशातील कानपूरमधील प्राणी संग्रहालयातील पक्ष्यांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर लखनौ येथील प्राणी संग्रहालयातील पक्षांचं सेक्शन बंद करण्यात आलं आहे.

पंजाब सतर्क

तसेच, आसपासच्या राज्यांमध्ये बर्ड फ्लू पसरल्यानंतर आता पंजाबनेही खबरदारी बाळगण्यास सुरुवात केली आहे. पोल्ट्री व्यवसायात असणाऱ्या लोकांना या संबंधित सर्व माहिती पुरवण्यात येत आहे.

Bird Flu in India

संबंधित बातम्या :

Bird Flu | परभणीत बर्ड फ्ल्यूचा धसका; संध्याकाळपर्यंत 10 हजार कोंबड्या नष्ट करणार

परभणीतल्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, महाराष्ट्र अलर्टवर

Bird Flu | बर्ड फ्लू नेमका काय?, लक्षणे कोणती?, औषध काय?, सर्व प्रश्नांची उत्तरं!

Bird Flu | कोंबडीचे मांस आणि अंडी खाल्ल्याने ‘बर्ड फ्लू’चा धोका? वाचा संशोधन काय म्हणतेय…

Published On - 1:03 pm, Mon, 11 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI