परभणीतल्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, महाराष्ट्र अलर्टवर

राज्यातील परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात तब्बल 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याची माहिती भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेने दिलीये. (maharashtra Bird flu parbhani)

परभणीतल्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, महाराष्ट्र अलर्टवर
राजस्थान, केरळ, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशनंतर आता महाराष्ट्रातही ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ‘बर्ड फ्लू’पासून बचाव करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 8:39 AM

परभणी :  महाराष्ट्रातील मांसाहारी लोकांसाठी एक चिंताजनक बातमी आहे. देशातील 6 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा पैलाव आढळून आल्यानंतर आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं स्पष्ट झालंय. 3 दिवसांपूर्वी मुरुंबा गावातील 800 कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच (Bird flu) झाल्याचं आता निष्पन्न झालं आहे. येथील जिल्हा प्रशासनाने मृत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये पाठवले होते. या नमुन्यांचे अहवाल आले असून मुरुंबा येथील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे या प्रयोगशाळेने सांगितले आहे. याची माहिती जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी दिली आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला असून मुंरुबा गावातील सर्व कोंबड्या आणि पाळीव पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, येथील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. (Bird flu cases confirmed in maharashtras parbhani district)

800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच

मागील काही दिवसांपासून राज्यातील ठाणे, लातूर, परभणीसाऱख्या भागामध्ये गिधाड, बगळे, कोंबड्यांचा अचानकपणे मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत होत्या. राज्यात अद्याप बर्ड फ्लूचा प्रदुर्भाव झाला नसल्याचे राज्य सरकारने सांगितलं होतं. मात्र, आता परभणी जिल्ह्यातील मरुंबा गावात 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे समोर आले आहे. 3 दिवसांपूर्वी मुरुंबा येथे 800 कोंबड्या मरण पावल्या होत्या. या कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने मध्ये प्रदेशमधील भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यानंतर या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे परभणीचे जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी सांगितलं आहे.

 मुरुंबा गावातील प्रत्येकाची तपासणी होणार

दरम्यान, परभणीमधील मुरुंबा गावात बर्ड फ्लूच्या केसेस आढल्यामुळे येथील प्रशासन सतर्क झाले आहे. मुरुंबा गावातील 1 किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या तसेच पाळीव पक्षी नष्ट करण्याचे आदेश परभणीचे जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी दिले आहेत. शिवाय गावातल्या लोकांचीसुद्धा वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. या भागात कुक्कुटपालकांची संख्या मोठी आहे. मुरुंबा, असोला या भागात 10 हजारपेक्षा अधिक कोंबड्या आहेत. या कोंबड्याच्या खरेदी विक्री आणि वाहतुकीवर दहा किलोमीटर परिसरात प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

परभणी जिल्ह्यात अलर्ट

मुरुंबा गावातली सर्व पक्षी नष्ट करण्यात येत असले तरी संपूर्ण परभणी जिल्ह्यात अलर्ट घोषित करण्यात आलाय. जिल्हाप्रशासन परभणी जिल्ह्यात पक्ष्यांचा सर्वे करणार आहे. इतर कुठे बर्ड फ्ल्यूचा प्रसार झालाय का याची माहितीसुद्धा प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे.

दरम्यान, स्थलांतरित पक्ष्यांमुळे जिल्ह्यात बर्ड फ्लू आल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जातोय. कोरोनाचं संकट संपूर्णत: दूर झालं नसताना आता बर्ड फ्लू आल्याने काळजी व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

Bird Flu | बर्ड फ्लू नेमका काय?, लक्षणे कोणती?, औषध काय?, सर्व प्रश्नांची उत्तरं!

Bird Flu | कोंबडीचे मांस आणि अंडी खाल्ल्याने ‘बर्ड फ्लू’चा धोका? वाचा संशोधन काय म्हणतेय…

Bird Flu Alert |  ‘बर्ड फ्लू’पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी कटाक्षाने टाळा

(Bird flu cases confirmed in maharashtras parbhani district)

Non Stop LIVE Update
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका.
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?.
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका.
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही.
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?.
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा.
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.