AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साप खरंच आपल्या जोडीदाराच्या मृत्यूचा बदला घेतो का? 99 टक्के लोकांना माहीत नसते नागाबद्दल ही खास गोष्ट

सापांबद्दल कायमच माणसांना कुतहल राहिलं आहे, काही गोष्टी या फॅक्ट असतात, तर काही गोष्टी या निव्वळ गैरसमज असतात. तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की नाग हा खरच आपल्या जोडीदाराच्या मृत्यूचा बदला घेतो का?

साप खरंच आपल्या जोडीदाराच्या मृत्यूचा बदला घेतो का? 99 टक्के लोकांना माहीत नसते नागाबद्दल ही खास गोष्ट
नाग खरच बदला घेतो का? Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 12, 2026 | 6:59 PM
Share

भारतावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. देशात प्रचंड प्रमाणात जैवविविधता आढळून येते. असंख्य प्रकारचे झाडं, प्राणी, पक्षी आढळून येतात. या सर्वांमध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणजे साप. भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळतात. परंतु त्यातील सर्वच प्रजाती या काही विषारी नाहीत. भारतामध्ये जे काही साप आढळतात, त्यातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच सापांच्या जाती या विषारी आहेत. त्यामध्ये घोणस, मण्यार, फुरसे आणि नाग या चार प्रमुख जातींचा समावेश होतो. या चार सापाच्या जाती अत्यंत विषारी असतात, यांना बिग फोर असं देखील म्हटलं जातं.  भारतात दरवर्षी साप चावल्यामुळे हजारो मृत्यू होतात, त्याची कारण वेगवेगळी आहेत.

परंतु आपल्याकडे सापांबद्दल अजूनही अनेक गैरसमज आहेत. त्यातील मोठा गैरसमज म्हणजे प्रत्येक साप हा विषारीच असतो. याच गैरसमजामुळे आपण अनेकदा साप दिसताच त्याला मारतो. मात्र त्यामुळे सध्या भारतातील सापांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे कुठेही साप दिसला तर त्याला न मारता किंवा पकडता त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी.

साप विशेष: नाग प्रजातीच्या सापांबद्दल असा देखील गैरसमज असतो की, तुम्ही जर नाग आणि नागीण यांच्या जोडीपैकी एका सापाला मारलं तर दुसरा साप हा आपल्या जोडीदाराचा बदला घेतो. ज्या व्यक्तीने जोडीदाराला मारलं आहे, त्याला तो सर्पदंश करतो. काही ठिकाणी अशा घटना घडतात, मात्र तो निव्वळ योगायोग असतो. कारण नाग अशा प्रकारचा बदला कधीही घेऊ शकत नाही. साप कोणत्याही जातीचा असू द्या, त्याचा मेंदू हा अत्यंत छोटा असतो, त्यामुळे तो कोणतीही गोष्ट लक्षात ठेवू शकत नाही. मग अशा स्थितीमध्ये तो आपल्या जोडीदाराचा बदला कसा घेणार? त्यामुळे नाग  किंवा इतर कुठलाही साप अशा प्रकारचा बदल कधीच घेत नाही.  काही ठिकाणी योगायोगाने अशी एखादी घटना घडते, त्यामुळे सर्वत्र अशी अफवा पसरते की नागाने बदला घेतला, परंतु तो एक योगायोग असतो.

Follow Us
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?