ट्रेनचे या बर्थचे नियम माहिती आहेत का? केवळ ठराविक वेळेत वापर करता येतो

तुम्ही भारतीय रेल्वेने प्रवास करीत असला आणि तुम्हाला जर मधला बर्थ दिला असेल तर तुम्हाला तो उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ माहीती असणे आवश्यक आहे, तसे केले तर भारतीय रेल्वे तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

ट्रेनचे या बर्थचे नियम माहिती आहेत का? केवळ ठराविक वेळेत वापर करता येतो
Indian Railway Rules for Passengers
| Updated on: Jan 05, 2025 | 7:47 PM

Indian Railway Rules for Passengers : भारतीय रेल्वेच्या या आसनाच्या ( Birth ) वापराचा नियम वेगळा आहे. या आसनाला ‘मिडल बर्थ’ असे म्हटले जाते. जर भारतीय रेल्वेने प्रवास करताना तुम्हाला ‘मिडल बर्थ’ अलॉट झाली आहे तर तुम्हाला या सीटला उघडण्याचा आणि बंद करण्याचा नियम माहिती असायला हवा आहे. त्यामुळे या सीटच्या उघडण्याचे आणि बंद करण्याची वेळ तुम्हाला माहिती असायला हवी. प्रवाशांना बसण्याची सुविधा मिळावी म्हणून दिवसाचे या सीटला फोल्ड करुन ठेवले जाते. चला तर पाहूयात सीटचे काय आहेत नियम….

1. भारतीय रेल्वेने मिडल सीटसाठी एक वेळापत्रक ठरविले आहे. त्या दरम्यान या मिडल बर्थला खोलून तुम्ही झोपू शकता. हा कालावधी सामान्यत: रात्री १० वाजता सुरु होतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता संपतो. या दरम्यान, मिडल सीट वर प्रवाशी झोपण्याच्या स्थितीत आसन ठेवू शकतात..

2. एकदा झोपण्याची वेळ संपल्यानंतर प्रवाशांना या मिडल बर्थला त्याच्या सरळ स्थिती म्हणून फोल्ड करुन ठेवावे लागते. त्यामुळे लोअर बर्थच्या माणसांना बसायला जागा मिळावी. त्यामुळे लोअर बर्थ आणि अपर बर्थवर प्रवासी आरामात बसू शकतात. हा नियम पाळावा लागतो. त्यानुसार दिवसाच्या वेळात मिडल बर्थ फोल्ड करुन ठेवावी लागते.

3. झोपायची वेळ झाल्यानंतर लोअर बर्थला मिडल बर्थ आणि लोअर बर्थच्या प्रवाशांना बसण्यासाठी सामान्य सीटप्रमाणे शेअर करावे लागते. यात कोचमध्ये बसण्याचा कमी जागेचा योग्य उपयोग केला जावा हा रेल्वे प्रशासनाचा दंडक असतो.

4. जर मिडल बर्थवर बसलेल्या प्रवाशाने सकाळी सहा वाजल्यानंतर त्यास फोल्ड करण्यास नकार दिला तर यामुळे अन्य प्रवाशांना यामुळे असुविधा होते. अशा प्रकरणात मिडील बर्थच्या प्रवाशांना या आसनाला फोल्ड करण्याची विनंती करण्याचा अधिकार आहे. जर मिडल बर्थचे प्रवासी असे करत नसेल तर ट्रेनच्या स्टाफकडे किंवा तिकीट तपासणीसांना आपण तक्रार करु शकतो.