जगाने पाहतच राहावा असा शाहीविवाह सोहळा रंगणार, उद्योगपतीच्या चिरंजीवाच्या लग्नाला ट्रम्प यांचा मुलगा येणार; भारतातील या शहरात अलर्ट

Donald Trump Junior : भारतातील एक प्रमुख शहरात एक शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जगाने पाहतच राहावा असा शाहीविवाह सोहळा रंगणार, उद्योगपतीच्या चिरंजीवाच्या लग्नाला ट्रम्प यांचा मुलगा येणार; भारतातील या शहरात अलर्ट
Royal Marriage
| Updated on: Nov 19, 2025 | 9:38 PM

राजस्थानमधील उदयपूर हे शहर एका खास विवाह सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे. लवकरच या शहरात भारतासह जगभरातील मोठे सेलिब्रिटी दाखल होणार आहेत. सर्वात मोठा सेलिब्रिटी म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा ट्रम्प ज्युनियर हाही या भव्य सोहळ्याला संपूर्ण कुटुंबासह हजर राहणार आहे. त्यामुळे या लग्नाची चर्चा सगळीकडे सुरु आहे. हे लग्न नेमके कुणाचे आहे? या लग्नासाठी कोणकोणते सेलिब्रिटी हजर राहणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

21 आणि 22 नोव्हेंबरला लग्न

समोर आलेल्या माहितीनुसार 21 आणि 22 नोव्हेंबरला उदयपूरमध्ये एका एनआरआय उद्योगपतीच्या मुलाचे लग्न होणार आहे. या लग्नाला ट्रम्प ज्युनियर देखील हजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी ट्रम्प ज्युनियर शुक्रवारी उदयपूरमध्ये पोहोचणार आहे. ट्रम्प ज्युनियरच्या सुरक्षेसाठी अमेरिकन सुरक्षा एजन्सी आधीच उदयपूरमध्ये पोहोचल्याचीही माहिती समोर आली आहे. ज्या उद्योगपतीच्या मुलाचे लग्न आहे तो अमेरिकेत राहतो.

पोलीस अधिक्षकांनी दिली महत्त्वाची माहिती

उदयपूरचे पोलिस अधीक्षक योगेश गोयल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, ट्रम्प यांच्या कुटुंबातील काही लोक लग्नासाठी उदयपूरमध्ये येत आहेत, त्यानुसार सुरक्षा व्यवस्थेची तयारी सुरू आहे. तसेच काही बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राजकारणी देखील या लग्नाला उपस्थित राहणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विवाहसोहळी पिचोला तलावाच्या मध्यभागी असलेल्या जग मंदिरात पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याचे उर्वरित कार्यक्रम सिटी पॅलेसमधील मानेक चौकात होणार आहेत. त्यामुळे ट्रम्प ज्युनियर विमानतळावर उतरल्यानंतर विशेष सुरक्षेसह पिचोला तलावाकडे प्रवास करणार आहेत. विवाह संपन्न झाल्यानंतर ते लीला हॉटेलमध्ये जाणार आहेत. या हॉटेलमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

उदयपूरची लोकप्रियता वाढली

दोन दिवस चालणाऱ्या या विवाह सोहळ्यादरम्यान, उदयपूरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे दोन दिवस विमानतळ ते पिचोला तलावाच्या मार्गावर विशेष सुरक्षा व्यवस्था असणार आहे. या दोन दिवसात विमानतळावर अनेक चार्टर्ड विमाने दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात सुरक्षेची खास खबरदारी घेण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये उदयपूरमध्ये अनेक हाय-प्रोफाइल विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. 2004 मध्ये अभिनेत्री रवीना टंडनचे लग्न उदयपूरमध्ये झाले होते, त्यामुळे हे शहर वेडिंग डेस्टिनेशन म्हणून उदयास आले आहे.

काही वर्षांपूर्वी मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीचे प्री-वेडिंग सेलिब्रेशनही उदयपूरमध्ये आयोडित करण्यात आले होते. त्यानंतर अभिनेता नील नितीन मुकेश, आमिर खानची मुलगी इरा, सनी देओलची भाची निकिता आणि क्रिकेटपटू हार्दिक पांड्या यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा विवाह सोहळा उदयपूरमध्ये पार पडला होता.