
भारताचे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात विविध क्षेत्रात कार्यकरणाऱ्या ४५ नायकांचा सन्मान करण्यात आला आहे. उद्या प्रजासत्ताक दिनी या महनीय व्यक्तींना राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार देऊ त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या महनीय व्यक्तीत मुंबईच्या डॉ. अर्मिडा फर्नांडीस यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून त्यांना उद्या सन्मानीत करण्यात येणार आहे. डॉ. अर्मिडा फर्नांडीस यांना औषध क्षेत्रातील बहुमोल कार्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. अर्मिडा फर्नांडिस ( Dr. Armida Fernandez) या मुंबईतील एक प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ ( Paediatrician ) आणि नवजात शिशु तज्ज्ञ ( Neonatologist ) आहेत. डॉ. अर्मिडा फर्नांडिस यांनी आशियातील पहिली ‘ह्यूमन मिल्क बँक’ स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. त्यांच्या कार्यामुळे शिशु मृत्यूदर कमी करण्यासाठी मदत झाली आहे, त्यांचे हे कार्य पाहून त्यांना साल २०२६ चा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. आर्मिडा फर्नांडीस यांना औषध- वैद्यकीय क्षेत्राबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी आशियातील पहिली ह्युमन मिल्क बँक स्थापन केली होती. त्यांनी जवळपास २००० नर्सेसना याबद्दल प्रशिक्षण दिले होते. १९८९ मध्ये सायन येथील लोकमान्य टिळक ( Lokmanya Tilak Municipal General Hospital ) रुग्णालयात त्यांनी आशियातील पहिली मानवी दुग्ध बँक सुरू केली. ज्यामुळे हजारो नवजात शिशुंचे प्राण वाचण्यास मदत झाली होती.
डॉ. आर्मिडा फर्नांडीस यांना नवजात शिशू आरोग्यातील योगदानाबद्दल ( Neonatologist ) ‘भारतीय निओनॅटोलॉजीची जननी’ ( Mother of Indian Neonatology ) म्हटले जाणार आहे. त्यांनी नवजात शिशूंच्या देखभाली संदर्भात बहुमोल कामगिरी केली आहे. त्यांच्या स्नेहा ( SNEHA ) नावाच्या संस्थेची स्थापना केली. मुंबईतील झोपडपट्टी भागातील महिला आणि मुलांच्या आरोग्यासाठी त्यांनी SNEHA ( Society for Nutrition, Education and Health Action ) नावाची ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली असून तिचे कार्य देशभरात आहे. डॉ. आर्मिडा फर्नांडीस या सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या डीन होत्या आणि नॅशनल निओनॅटोलॉजी फोरमच्या माजी अध्यक्षा आहेत. त्यांनी आतापर्यंत दोन हजाराहून अधिक नर्सेसना आणि डॉक्टरांना प्रशिक्षण देऊन बालमृत्यूचे प्रमाण हे ७० टक्क्यांवरुन १२ टक्क्यांपर्यंत कमी आणण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.