भारताचे आकाश क्षेपणास्त्र आणखी दमदार, आता लांबचा टप्पा गाठणार, DRDO कडून महत्वाचा बदल होणार

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेकडून आकाश क्षेपणास्त्रात बदल करण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे आकाश क्षेपणास्त्राचा टप्पा, वेग आणि मारक क्षमता वाढणार आहे. जास्त खर्च न करता क्षेपणास्त्राला अधिक घातक बनवले जात आहे.

भारताचे आकाश क्षेपणास्त्र आणखी दमदार, आता लांबचा टप्पा गाठणार, DRDO कडून महत्वाचा बदल होणार
akash missile
Image Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
| Updated on: Jun 05, 2025 | 12:08 PM

पाकिस्तानसोबत झालेल्या तणावानंतर भारताने आपले संरक्षण तंत्रज्ञान अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत पाकिस्तान तणावादरम्यान भारताच्या आकाश क्षेपणास्त्राने कमालीचे काम केले होते. पाकिस्ताचे क्षेपणास्त्र अवकाशात नष्ट केले होते. तसेच अचूक हल्लेही केले होते. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आकाश क्षेपणास्त्र अधिक अत्याधुनिक बनवण्याचे दिशेने काम सुरु केले आहे.

टप्पा, वेग, मारक क्षमता वाढणार

संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरडीओने आकाश क्षेपणास्त्रास अधिक दमदार बनवण्यासाठी काम सुरु केले आहे. क्षेपणास्त्राच्या आरखड्यात किंवा इतर कोणताही बदल न करता ऑपरेशनल क्षमता अधिक चांगली करण्यात येणार आहे. त्यासाठी डीआरडीओ Alternative Propulsion Fuels (APF) च्या विकासावर काम सुरु केले आहे. त्यामुळे आकाश क्षेपणास्त्राचा टप्पा, वेग आणि मारक क्षमता वाढवण्यात येणार आहे. जास्त खर्च न करता क्षेपणास्त्राला अधिक घातक बनवले जात आहे.

अधिक वेगाने क्षेपणास्त्र जाणार

आकाश क्षेपणास्त्र देशाच्या अवकाश संरक्षण प्रणालीचा महत्वाचा भाग आहे. त्यात ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचे अनेक ड्रोन आणि शॉर्ट-रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाडून आपला प्रभाव दाखवून दिला. आता डिआरडीओचे वैज्ञानिक या प्रणालीस Ramjet Sustainer Motor (RSM) ला अपग्रेड करण्याचे काम करत आहे. ही मोटर क्षेपणास्त्रास बूस्ट दिल्यानंतर हवेत जास्त वेगाने क्षेपणास्त्र पाठवण्यास मदत करणार आहे. त्यात नेक्स्ट जनरेशन फ्यूल्सचा वापर thrust आणि burn क्षमतेत सुधारणा केली जाणार आहे. त्यामुळे क्षेपणास्त्राचा वेग, रेंज यामध्ये सुधारणा होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरडीओ नवीन इंधन करण्याच्या कामावर काम करत आहे. त्यात विद्यामान आकाश क्षेपणास्त्र प्रणालीत कोणताही बदल न करता वापर करता येणार आहे. हा बदल वेळ आणि पैसाही वाचवणार आहे. कारण त्यासाठी क्षेपणास्त्राच्या फिजिकल रीडिजाइनमध्ये बदल करण्याची गरज पडणार नाही. डीआरडीओकडून यासंदर्भात अधिकृत माहिती दिले गेली नाही. परंतु आकाश क्षेपणास्त्रची क्षमता वाढवण्याचे प्रयोग सुरु झाले आहे.