Crop Loan: मोठी आनंदवार्ता! आता जिल्हा बँकांनाही द्यावे लागणार मोफत ऑनलाईन पीक कर्ज
NABARD Crop Loan: शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. त्यानुसार आता जिल्हा बँकांवरही ऑनलाईन पीक कर्जाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता राष्ट्रीयकृतच नाही तर जिल्हा बँकांकडे पण कर्जासाठी धाव घेता येईल.

NABARD Crop Loan: शेतकऱ्यांसाठी एक आनंदवार्ता आली आहे. तातडीने कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकांसोबत आता जिल्हा बँका सुद्धा उपलब्ध असतील. कारण आजही अनेक जिल्ह्यांमध्ये आजही जिल्हा बँका आणि विविध सहकारी विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. सरकारने राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज मागणी आता ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आता जिल्हा बँकांना सुद्धा मोफत ऑनलाईन कर्ज प्रक्रिया पूर्ण करुन द्यावी लागणार आहे. यासाठी नाबार्डने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
ई-किसान पोर्टल
शेतकऱ्यांना सहज पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने जनसमर्थ पोर्टलद्वारे पीक कर्जाची मागणी करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडील कर्जदारांना त्याचा फायदा होणार आहे. आगामी काळात शेतकऱ्यांना मोफत ऑनलाईन पीक कर्ज प्रक्रिया पूर्ण करता यावी यासाठी नाबार्ड संस्थेने ई-किसान पोर्टल तयार केले आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा बँकांनाही ऑनलाईन पीक कर्ज प्रक्रिया मोफतपणे राबवता येईल. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. त्यांना त्वरीत कर्ज मिळवता येईल. तसेच कर्जाचा सर्व हिशोब ऑनलाईन दिसेल.
जिल्हा बँका विवध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज द्यावे लागते. त्यामुळे पोर्टलचा उपयोग होत नाही. अशावेळी जिल्हा बँकानांही कर्ज वितरणासाठी ई-किसान पोर्टलाचा वापर करता येईल. लवकरच त्यासाठी प्रणाली कार्यान्वीत होण्याची शक्यता आहे. त्यासाठी लवकरच एक समिती गठीत होईल. त्यामध्ये तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक प्रतिनिधी हे त्याविषयी पुढील प्रक्रिया राबवतील.
विनाशुल्क ऑनलाईन पीक कर्ज
ऑनलाईन पीक कर्जासाठी कोणतेही शुल्क आकारल्या जाणार नाही. जनसमर्थ पोर्टलवर शेतकऱ्यांना अतिरिक्त अर्जफाट्याशिवाय कमीत कमी कालावधीत कर्ज मिळेल. ऑनलाईन प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना शुल्क द्यावे लागणार नाही. अशीच प्रक्रिया नाबार्डही राबवणार आहे. ई-किसान पोर्टलच्या माध्यमातून हा सोय लवकरच करुन देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्ज घेण्यासाठी कष्ट पडणार नाही.
