
रेडिको खेतान प्रस्तुत तसेच टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास हे होस्ट असलेल्या Duologue NXT Season 1 च्या ग्रँड फिनाले एपिसोडमध्ये लक्सर रायटिंग इन्स्ट्रुमेंट्सच्या मॅनेजिंग डायरेक्टर पूजा जैन गुप्ता या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या खास एपिसोडमध्ये अशा सर्व महिलांचं कौतुक करण्यात आलं, ज्यांनी सुरू असलेल्या परंपरांना फाटा देत, खऱ्या अर्थानं आपलं नेतृत्व सिद्ध केलं.
या कार्यक्रमात बरुण दास यांनी तीन स्तरावर “आउट्लायर” अपवादात्मक व्यक्तित्व अशी पूजा जैन गुप्ता यांची ओळख करून दिली, ज्यांनी आपल्या पिढीगत व्यवसायाची कमान समर्थपणे सांभाळली, पारंपरिक व्यवसायातील नेतृत्व नव्यानं परिभाषित केलं, तसेच आजच्या डिजिटल युगात निर्भयपणे नवोन्मेष सुरू असलेली महिला अशी ओळख पुजा जैन गुप्ता यांची यावेळी करून देण्यात आली.
मी स्वत:ला कधीच वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करत नाही, मी जशी आहे, तशीच आहे. मला जे योग्य वाटतं तेच मी बोलते. माझ्या हृदयात जे विचार असतात तेच माझ्या डोक्यात देखील असतात, असं यावेळी पूजा जैन यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना जैन यांनी आपल्या वडिलांच्या दूरदृष्टीचं कौतुक केलं ज्यांनी लक्सर रायटिंग इन्स्ट्रुमेंट्सच्या पाया घातला, तसेच त्यांनी यावेळी आपल्या आईच्या प्रयत्नांचा देखील उल्लेख केला, ज्यांच्या विशेष प्रयत्नामुळे या व्यावसायाचा विस्तार झपाट्यानं झाला.
दरम्यान ब्रँड तज्ज्ञ बरुण दास यांनी यावेळी लक्सरच्या प्रवासाचं कौतुक केलं आहे. तुम्ही एका सामान्य उत्पादनापासून सुरुवात केली, त्यानंतर या उत्पादनाला एक महत्त्वाकांक्षी ब्रँड बनवले आणि नंतर ते लक्झरीचे प्रतीक बनवले, ही केवळ एक ब्रँड-बिल्डिंग नाही, तर सांस्कृतिक पुनर्जागरण आहे, असं यावेळी बरुण दास यांनी म्हटलं. दरम्यान भविष्यातील योजनांबाबत बोलताना पूजा यांनी म्हटलं की, लक्सरची पुढची पिढी लवकरच समोर येईल, आम्ही शिक्षण आणि सर्जनशीलतेवर लक्ष केंद्रीत करत आहोत. दरम्यान यावेळी बोलताना पुजा यांनी टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांचं कौतुक देखील केलं आहे, बरुण दास यांचे प्रश्न हे खूपच वेगळ्या धाटणीचे होते, ते साध्या आणि सोप्या भाषेत संवाद साधतात, जे मला खूप भावलं, मला या शोमध्ये येऊन खूप आनंद झाला, हा शो ज्या महिला पहातात त्यांना यातून प्रेरणा मिळावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा असं मला वाटतं असं यावेळी पूजा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान या कार्यक्रमात पूजा चांगल्याच भावुक झाल्या त्यांनी म्हटलं की, माझे वडील हेच माझे खरे हिरो आणि मार्गदर्शक आहेत. त्यांच्याकडून मला जी संयमाची शिकवण मिळाली, त्यामुळेच मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटाचा धैर्याने सामना करू शकले, आणि जेव्हा मी गडबडले तेव्हा मला माझ्या आईच्या ताकदीने नेहमी प्रथम लक्सर,याची आठवण करून दिली, असं पूजा यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान या शोमध्ये त्यांना विचारण्यात आलं, तुम्ही स्वत:ला एक नेतृत्व म्हणून किती गुण द्याल, तेव्हा त्यांनी मोठ्या नम्रतेनं म्हटलं की मी मला सहा गुण देईल, कारण मला अजूनही असं वाटतं की मला जे करायचं आहे, ते अजून मी केलेलं नाहीये.
दरम्यान या एपिसोडचा शेवट करताना बरुण दास यांनी म्हटलं की, पूजा यांचा प्रवास हा एका अशा व्यक्तीचा प्रवास आहे, ज्यांनी आपल्या दृढनिश्चयाने स्वतःचे नशीब स्वतः घडवले आहे, प्रचंड दबाव असतानाही न डगमगता त्यांनी आपली वाटचाल सुरूच ठेवली आहे. पूजा यांचा जीवन प्रवास हा याचा सर्वात मोठा पुरावा आहे की, वारसा हा जन्माने नाही तर कठोर परिश्रमाने मिळतो. त्यानंतर पूजा यांनी या कार्यक्रमाच्या शेवटी म्हटलं की, महिलांमध्ये अमर्याद क्षमता असते, त्यामुळे तुम्ही कधीच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नका, जर तुमच्याकडे तुम्ही करत असलेल्या कामाप्रती चिकाटी, समर्पण आणि सचोटी असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही, असं पूजा यांनी म्हटलं आहे.
पूजा जैन गुप्ता यांच्यासोबत ड्युओलॉग एनएक्सटीचा हा विशेष भाग 15 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री साडेदहा वाजता न्यूज9 वर प्रसारीत होणार आहे, तसेच या कार्यक्रमाचं स्टिमिंग ड्युओलॉगच्या यूट्यूब चॅनल (@Duologuewithbarundas) आणि न्यूज९ प्लस अॅपवर देखील केलं जाणार आहे.