AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Police : दुसऱ्यांना वाचवणाऱ्या पोलिसांनाच पळवून, पळवून मारलं वरं लुटलं, दिल्ली पोलिसांनी जे सांगितलं ते खूप भयानक

Delhi Police : कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना वाचवण्याची जबाबदारी पोलिसांची असते. पोलिसांची भूमिका खूप महत्वाची असते. पण दिल्लीत पोलिसांबरोबर जे घडलं ते आता समोर आलय.

Delhi Police : दुसऱ्यांना वाचवणाऱ्या पोलिसांनाच पळवून, पळवून मारलं वरं लुटलं, दिल्ली पोलिसांनी जे सांगितलं ते खूप भयानक
Delhi Police
| Updated on: Jul 23, 2026 | 3:46 PM
Share

दिल्लीमध्ये सध्या विद्यार्थी आंदोलन सुरु आहे. या आंदोलना दरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप झाला. पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये हिंसक झडपा झाल्या. पोलिसांवर आंदोलन दडपून टाकण्याचे आरोप झाले. या दरम्यान आता पोलिसांनी त्यांची बाजू मांडली आहे. आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी परिस्थिती हिंसक बनली असं पोलीस अधिकारी आणि जवानांनी दावा केला. पोलिसांवर सुद्धा हल्ले झाले. मिर्ची स्प्रे मारण्यात आला, दगडफेक झाली आणि काही ठिकाणी पोलिसांना मारहाण आणि लूटमारही झाली. जंतर-मंतरवर तैनात असलेले इंस्पेक्टर नंदकिशोर यांनी सांगितलं की, “आंदोलकांनी त्यांना जसं पोलिसी गणवेशात पाहिलं, ते उग्र झाले. आंदोलक लाठ्या-काठ्या घेऊन आलेले. पोलिसांना ते टार्गेट करत होते” माझी जवळपास दोन तोळ्याची चैन हिसकावून नेली. डोक्याला मार लागला असं इंस्पेक्टर नंदकिशोर यांनी सांगितलं.

दिल्ली पोलीस दलातील एसीपी विजय सिंह यांनी 20 जुलैच्या घटनेचा सुद्धा उल्लेख केला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आंदोलकांनी त्या दिवशी माझ्यावर आणि माझ्या टीमवर मिर्ची स्प्रेची फवारणी केली. व्हायरल व्हिडिओमध्ये एका पोलीसाला जमावाने घेरलेलं. पळवून, पळवून त्याला मारलं.

चारही बाजूने घेरुन त्याला मारत होते

दिल्ली पोलिसांचा जवान खाली पडल्यानंतरही चारही बाजूने घेरुन त्याला मारत होते. मोठ्या मुश्किलिने प्राण वाचले. नंतर हाच व्हिडिओ इशारा म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झाला, असा पोलिसांचा दावा आहे. दिल्ली पोलिसांनुसार ज्या दिवशी प्रदर्शन सुरु होतं, त्या दिवशी 4.30 वाजता जंतर-मंतरवर ड्यूटीवर तैनात असलेले एसीपी जय प्रकाश दगडफेकीत जखमी झाले. आंदोलकांनी फेकलेला दगड त्यांना येऊन लागला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं.

हल्ल्याची चौकशी सुरु

दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की, त्यांची पूर्ण टीम कारवाई दरम्यान कायदा-सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत होती. हिंसाचार आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी सुरु आहे. उपलब्ध व्हिडिओ आणि साक्षीच्या आधारावर कायदेशीर कारवाई केली जाईल. दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन सुरु आहे.

Follow Us
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत