AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली हादरली, राजधानीसह भारतातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के

मोठी बातमी समोर येत आहे, दिल्ली-एनसीआर सह भारताच्या अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचं केंद्र अफगानिस्तानमधील हिंदूकुश क्षेत्रामध्ये 191 किलोमीटर एवढं खोल आहे.

दिल्ली हादरली, राजधानीसह भारतातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के
EarthquakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 27, 2026 | 8:13 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, दिल्ली-एनसीआर सह भारताच्या अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचं केंद्र अफगाणिस्तानमधील हिंदूकुश क्षेत्रामध्ये 191 किलोमीटर एवढं खोल आहे. या भूकंपाची तीव्रता 6.2 रिस्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानच्या हिंदूकुश क्षेत्रात शनिवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी 6.2 रिश्टल स्केल तीव्रतेचा भूंकप आला.राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (National Centre for Seismology) ने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचं केंद्र पूर्वोत्तर अफगाणिस्तानमधील कालाफगान पासून जवळपास 81 किलोमीटर दूर 36.442 ° उत्तर अक्षांश आणि 70.672 ° पूर्व रेखांशादरम्यान होते. या भूकंपाचे धक्के चीन, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, किर्गिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि भारतामध्ये जाणवले.

दिल्ली एनसीआरमध्ये काही सेकंद या भूकंपाचे धक्के जाणवले, या भूकंपाच्या घटनेमध्ये अजूनपर्यंत तरी कुठलीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्याची बातमी समोर आलेली नाहीये. तज्ज्ञांच्या मतानुसार या भूकंपाचा केंद्रबिंदु जमिनी खाली खूप खोल असल्यामुळे अनेक देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मात्र या भूकंपामुळे कुठेही फारस नुकसान झालेलं नाहीये. अफगाणिस्तानचा हिंदूकुश परिसर हा भूकंपप्रवण क्षेत्र आहे. या भागात यापूर्वी देखील अनेकदा भूकंपाच्या घटना घडल्या आहेत, अता पुन्हा एकदा या भागात  6.2 रिश्टल स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपाचे धक्के भारतात देखील जाणवले आहेत.

जम्मू -काश्मीरमध्ये देखील या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. लोकं घर आणि ऑफिरमधून बाहेर पळाले. जम्मू काश्मीर देखील भूकंपाच्या दृष्टीकोनातून फारच संवेदनशील भाग आहे. राज्यात यापूर्वी देखील अनेकदा कमी आणि मध्यम तीव्रतेचे भूकंप झाले आहेत. या भूकंपाची नोंद 6.2 रिस्टल स्केल एवढी नोंदवण्यात आली आहे, हा एक मोठा भूकंप मानला जातो, यामुळे प्रचंड नुकसान देखील होऊ शकतं. मात्र या भूकंपामध्ये फार काही नुकसान झालेलं नाहीये.

Follow Us
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती