Earthquake in Delhi | दिल्ली हादरली! भूकंपाचे तीव्र धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता तब्बल 5.5 रिश्टर स्केल होती, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

Earthquake in Delhi | दिल्ली हादरली! भूकंपाचे तीव्र धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
earthquake
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 05, 2023 | 10:21 PM

नवी दिल्ली | 5 ऑगस्ट 2023 : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता तब्बल 5.5 रिश्टर स्केल होती, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. आज रात्री 9 वाजून 34 मिनिटांच्या सुमारास दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान येथील हिंदूकूश पर्वत येथे भूकंपाचं केंद्र होतं. सध्या तरी कोणत्याप्रकारच्या जीवितहानीची किंवा इतर नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. पण भूकंपाची तीव्रता जास्त होती. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

अफगाणिस्तानच्या हिंदूकूश येथे भूकंपाचे केंद्र असल्यामुळे भारतासह पाकिस्तानतही धक्के जाणवले आहेत. जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. विशेष म्हणजे भूकंपाची घटना ही पहिली नाहीय. याआधी देखील वारंवार दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत.