लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची उपसेनाध्यक्ष पदावर निवड

| Updated on: Jan 18, 2022 | 3:20 PM

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (Manoj Pande) यांची पुढील व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची उपसेनाध्यक्ष पदावर निवड
Follow us on

नवी दिल्ली: भारत सरकारकडूनने ईस्टर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (Manoj Pande) यांची पुढील व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. मनोज पांडे हे भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख असून देशाच्या विविध भागात त्यांनी देशसेवा केली आहे.

इथिओपिया व इरिशिया या देशात झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेमध्येही त्यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे. कारगिलमध्ये त्यांनी महत्वाच्या पदावर काम केले असून त्यांना भारत सरकारकडून अतिविशिष्ट सेवेचे पदक देऊन गौरविण्यात आले आहे.