AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5000 कोटींची लोकांची फसवणूक, ईडीने मोठ्या आरोपीला केली अटक

ईडीने दिल्ली विमानतळावरून एका मोठ्या आरोपीला अटक केली आहे. ईडीचे म्हणणे आहे की आरोपींविरुद्ध 5000 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. आणखी एका आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

5000 कोटींची लोकांची फसवणूक, ईडीने मोठ्या आरोपीला केली अटक
shailesh musale
shailesh musale | Updated on: Apr 09, 2024 | 10:27 PM
Share

ED arrest : अंमलबजावणी संचालनालयाला मोठे यश मिळाले आहे. कारण ईडीने दिल्लीच्या IGI विमानतळावरून एका मोठ्या आरोपीला अटक केली आहे. ईडीचे म्हणणे आहे की आरोपीने सायबर क्राईम आणि ऑनलाइन गेमिंगद्वारे सामान्य लोकांची 5000 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आल्याचेही ईडीने म्हटले आहे. हे आरोपी फसवणुकीचा पैसा लाँडरिंग करण्यासाठी भारताबाहेर पाठवत असत.

नेपाळहून आल्यानंतर अटक

अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी सांगितले की, सायबर गुन्हे आणि ऑनलाइन गेमिंगद्वारे सामान्य लोकांकडून सुमारे 5,000 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात आणखी एका आरोपीला अटक केलीये. पुनीत कुमार उर्फ ​​पुनीत माहेश्वरीला 3 एप्रिल रोजी नेपाळहून आल्यानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-3 वरून अटक करण्यात आली, असे एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे.

दिल्लीच्या मोती नगर भागात राहणाऱ्या कुमारवर सायबर गुन्ह्यांमधून सर्वसामान्यांची फसवणूक करणे, गुन्ह्यातून मिळालेली रक्कम लाँडरिंग करणे आणि त्यांना भारताबाहेर पाठवल्याचा आरोप आहे.

पुनित कुमार उर्फ ​​पुनित माहेश्वरी याने संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये असलेल्या सर्व्हरचा वापर करून लोकांची फसवणूक केली आहे. गेल्या महिन्यात ईडीने याच प्रकरणात आणखी एक आरोपी आशिष कक्करला गुरुग्राममधील हॉटेलमधून अटक केली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत कारागृहात आहे. हे मनी लाँड्रिंग प्रकरण दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणा आणि इतर काही ठिकाणी दाखल पोलिस एफआयआरशी संबंधित आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?