पेट्रोल पंपावरील मोदींचे बॅनर 72 तासांत हटवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

| Updated on: Mar 03, 2021 | 10:45 PM

5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने या राज्यांमधील सर्व पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेले बॅनर हटवण्याचे आदेश दिले आहेत

पेट्रोल पंपावरील मोदींचे बॅनर 72 तासांत हटवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश
Follow us on

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने या राज्यांमधील सर्व पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेले बॅनर हटवण्याचे आदेश दिले आहेत. पीटीआयने विश्वासू सूत्रांच्या आधारे याबाबत माहिती दिली आहे.(Election Commission orders removal of PM Modi’s banners on petrol pumps)

मतदान आणि टप्पे

5 राज्यांमध्ये विधानसभेच्या 824 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 27 मार्च ते 29 एप्रिलपर्यंत मतदान होणार आहे. तर सर्व राज्यांमधील निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी लागणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी मध्ये 6 एप्रिलला एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर पश्चिम बंगालमध्ये एकूण 8 टप्प्यात निवडणूक होईल. 27 मार्च ते 29 एप्रिलपर्यंत हे मतदान पार पडेल. तर 2 मे रोजी निकाल लागणार आहे.

पश्चिम बंगालमधील 8 टप्पे

पहिला टप्पा – 30 जागा | मतदान – 27 मार्च

दुसरा टप्पा – मतदान 1 एप्रिल

तिसरा टप्पा – मतदान 6 एप्रिल

चौथा टप्पा – मतदान 10 एप्रिलला

पाचवा टप्पा – मतदान 17 एप्रिल

सहावा टप्पा -मतदान 22 एप्रिल

सातवा टप्पा – मतदान 26 एप्रिल

आठवा टप्पा -मतदान 29 एप्रिल

पश्चिम बंगालची निवडणूक प्रतिष्ठेची

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 211 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला 44, डाव्या पक्षांना 26 आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता.

भाजप नेत्यांनी जोर लावला

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथून टाकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपच्या दिग्गजांनी बंगालमध्ये सभांचा धडाका लावला होता. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये आहे. तर अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांनी ममतांवर चहूबाजूने हल्ला चढवला आहे.

राजकीय गणित काय?

पश्चिम बंगालमध्ये 294 सदस्यांची विधानसभा आहे. 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने तब्बल 219 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवलं होतं. या विजयासाठी ममता बॅनर्जींनी सलग दुसऱ्यांदा बंगालमध्ये सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी काँग्रेसला केवळ 23, डाव्यांना 19 आणि भाजपला 16 जागाच मिळाल्या होत्या. आता भाजप आपल्या 16 जागांवरुन किती जागांवर विजय मिळवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

ममता बॅनर्जींविरोधात मुख्यमंत्रीपदाचा भाजपचा चेहरा कोण? दिग्गज क्रिकेटपटुच्या नावाची जोरदार चर्चा

West Bengal Election 2021 : तेजस्वी यादवांनंतर आता अखिलेश यादवांचंही ममता बॅनर्जींना समर्थन, भाजपला रोखणं शक्य होणार?

Election Commission orders removal of PM Modi’s banners on petrol pumps