Voting : घरापासून दूर असतानाही करा मतदान, निवडणूक आयोगाचा काय आहे प्लॅन? रिमोट वोटिंगचा वापर कसा करणार

| Updated on: Jan 01, 2023 | 6:09 PM

Voting : आता तुम्हाला घरापासून दूर असतानाही मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे..

Voting : घरापासून दूर असतानाही करा मतदान, निवडणूक आयोगाचा काय आहे प्लॅन? रिमोट वोटिंगचा वापर कसा करणार
बजावा मतदानाचा हक्क
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission) प्रवासी मतदारांसाठी रिमोट वोटिंगची (Remote Voting) सुविधा आणली आहे. दूरस्थ मतदान प्रक्रियेमुळे स्थलांतरीत (Domestic Migrants), रोजगारासाठी दुसऱ्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या मतदारांना मतदान करणे सोपे होईल. मतदार राजा कुठेही असला तरी त्याला मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे. निवडणूक आयोगाने त्यासाठी खास प्रोटोटाईप मल्टी-कॉन्स्टीट्यूएंसी रिमोट इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (RVM) विकसीत केली आहे.

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे. देशाची लोकसंख्याही फार मोठी आहे. मतदान नोंदणी आणि मतदारांची संख्या वाढूनही मतदानाचा टक्का मात्र कायम घसरलेलाच असतो. सर्वच मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होत नाही. स्थलांतर हे त्यामागचे सर्वात मोठे कारण आहे.

प्रवासी मतदारांना इच्छा असूनही ते मतदान प्रक्रियेपासून दूर राहतात. त्यांना मतदान करता येत नाही. त्यांना मतदानासाठी सुट्टी टाकून गावाकडे येणे शक्य नसते. परिणामी मतदानाचा टक्का घसरतो. 2011 मधील जनगणनेनुसार, 45.36 कोटी (37टक्के) भारतीय प्रवासी आहेत. त्यांच्या मतदार संघापासून ते दूर आहेत.

हे सुद्धा वाचा

रिमोट इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (RVM) सध्याच्या ईव्हीएम मशिनची सुधारीत आवृत्ती आहे. या यंत्राच्या मदतीने प्रवासी भारतीयांना दूर असूनही त्यांच्या मतदार संघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येईल. सध्या या पथदर्शी प्रकल्पावर काम सुरु आहे. लवकरच त्याचा वापर करण्यात येणार आहे.

निवडणूक आयोग आरव्हीएमचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी काम करत आहे. त्यासाठी बहु-घटकांमध्ये रिमोट कंट्रोल युनिट, रिमोट बॅलेट युनिट, रिमोट व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल, मतदारसंघ कार्ड रीडर, पब्लिक डिस्प्ले कंट्रोल युनिट आणि रिमोट सिम्बॉल लोडिंग युनिट यांचा समावेश असेल. RVM च्या आधारे 72 मतदार संघात मतदानाचा हक्क बजाविता येईल.

रिमोट कंट्रोल युनिट प्रत्येक मतदार क्षेत्रात प्रत्येक उमेदवाराला किती मतं मिळाली याची नोंद करेल. दूरस्थ मतदान प्रक्रियेद्वारे प्रवासी मतदारांना मतदानाचा हक्क बजाविता येईल. त्याच्या मतदार संघातील आवडीच्या उमेदवाराला मतदान करता येईल.

या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या प्रवासी मतदाराला अगोदर नोंदणी करावी लागेल. त्याच्या मतदार संघातील निवडणूक कार्यालयात ही नोंद होईल. ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नोंदणी करावी लागले. मतदाराच्या पडताळ्यानंतर प्रवासी मतदाराला मतदान करता येईल.