सर्वात मोठी बातमी… SIRच्या वादात सीजेपीची उडी, निवडणूक आयुक्तांविरोधात आशुतोष रांकाची पहिली पोस्ट; म्हणाले…

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार एसआयआर वादात अडकले आहेत. ठाकरे गट व सीजेपीने त्यांच्यावर गंभीर आरोप करत लोकशाही धोक्यात आणल्याचा दावा केला आहे. मतदार यादीतील त्रुटींवरून वाद निर्माण झाला असून, ज्ञानेश कुमार यांची भाजपकडे झुकण्याची भूमिका असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

सर्वात मोठी बातमी... SIRच्या वादात सीजेपीची उडी, निवडणूक आयुक्तांविरोधात आशुतोष रांकाची पहिली पोस्ट; म्हणाले...
Election Commissioner Gyanesh Kumar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 23, 2026 | 12:04 PM

निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या एसआयआरवरून वाद निर्माण झाला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या दाव्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाने तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयुक्तांनी देशाशी बेईमानी केल्याचा आरोपही ठाकरे गटाने केला आहे. आता कॉकरोच जनता पार्टीनेही या एसआयआरच्या वादात उडी घेतली आहे. सीजेपीचे सहसंयोजक आशुतोष रांका यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे.

सीजेपी नेते आशुतोष रांका यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी इंडियन एक्सप्रेसची बातमीही रिपोस्ट केली असून देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जेव्हा देशाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा लोकशाही बरबाद करण्याच्या यादीत ज्ञानेश कुमार यांचं नाव खूप वर असेल, असं आशुतोष रांका यांनी म्हटलं आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टमध्ये एसआयआरच्या प्रक्रियेवरून गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या तीन सदस्यांच्या पॅनलमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांचा समावेश आहे. सुखबीर संधू आणि विवेक जोशींनी गेल्या 10 महिन्यात 14 वेळा ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. मतदार यादीत नवीन मतदारांची नोंदणी, नाव हटवणे आणि पुन्हा नाव नोंदवणे याबाबतच्या या हरकती होत्या.

भाजपमध्ये सामील व्हा

या आधी टीएमसीच्या निवडणूक चिन्हाच्या प्रकरणावरून सीजेपी नेते अभिजीत दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांवर हल्ला चढवला होता. निवडणूक आयुक्त भाजपचं लांगूलचालन करत असल्याचा आरोप दीपके यांनी यापूर्वीच केला होता. तसेच ज्ञानेश कुमार यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये सामील व्हावं, असा टोलाही त्यांनी लगावला होता. निवडणूक आयोग ज्या पद्धतीने काम करत आहे, त्यावरून त्यांच्या निष्पक्षता आणि स्वतंत्र भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

कोण आहेत ज्ञानेश कुमार?

ज्ञानेश कुमार हे 1988च्या केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. 31 जानेवारी 2024मध्ये यूनियन कोऑपरेशन सेक्रेटरी पदावरून ते निवृत्त झाले होते. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अंतर्गत येत असलेल्या मंत्रालयाचे ते मे 2022 मध्ये सेक्रेटरी होते. त्यानंतर 14 मार्च 2024मध्ये त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त बनवण्यता आलं. 15 मार्च रोजी त्यांनी कार्यभार सांभाळला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. निवडणूक आयुक्ताचं पद सांभाळल्यानंतर एक वर्षानंतर त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त बनवलं गेलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us