AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्ञानेश कुमार आणि अमित शाह यांना हटवा, आर्मीची मदत घ्या; संजय राऊत यांची थेट राष्ट्रपतींकडे मागणी

संजय राऊत यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांना पदावरून हटवण्याची राष्ट्रपतींकडे मागणी केली आहे. ज्ञानेश कुमार लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप करत, त्यांच्या मनमानी कारभारावर इतर निवडणूक आयुक्तांनीही आक्षेप घेतल्याचे राऊत म्हणाले.

ज्ञानेश कुमार आणि अमित शाह यांना हटवा, आर्मीची मदत घ्या; संजय राऊत यांची थेट राष्ट्रपतींकडे मागणी
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 23, 2026 | 10:20 AM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात त्यांच्याच दोन सहकाऱ्यांनी मनमानी करत असल्याचा आरोप केला आहे. ज्ञानेश कुमार यांनी लोकशाहीची हत्या केली आहे. ते बेईमानी करत आहेत. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांना पदावरून बरखास्त केलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जमत नसेल तर राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करून ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करून त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे. ज्ञानेश कुमार ज्यांच्या इशाऱ्यावरून हे करत आहेत, ते केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शाह यांनाही मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात यावं, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ज्ञानेश कुमार आणि अमित शाह यांची हकालपट्टी नाही केली तर जनआंदोलनाचा भडका उडेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांना गेल्या 10 महिन्यात 14 वेळा इतर निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी आक्षेप घेतला आहे. तसं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. त्यावर मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी ही मागणी केली. निवडणूक आयोग तीन लोकांचा बनलेला असतो. पण ज्ञानेश कुमार यांची मनमानी सुरू आहे. सुखबीर संधू आणि विवेक जोशी या दोन निवडणूक आयुक्तांनी 10 महिन्यात 14 वेळा हरकती घेतल्या आहेत. ज्ञानेश कुमार मनमानीपणे काम करत आहे. बेईमानी करत आहे. कॅबिनेट सेक्रेटरीपर्यंत त्यांच्या तक्रारी गेल्या आहेत. हे लोकशाहीसाठी घातक आहे, असं संजय राऊत म्हणाले.

बरखास्त करून खटला भरा

अमित शाह यांच्या अधिपत्याखाली निवडणूक आयोग येतो. याचा अर्थ ज्ञानेश कुमार हे अमित शाह यांच्या सूचनेनुसार आणि दबावाखाली संगनमताने गुन्हेगारी स्वरुपाचं कृत्य करत होते. या प्रकरणात अमित शाह पहिल्या क्रमांकाचे गुन्हेगार आहेत. त्यांना फूड पॉइजन झालंय. ते बेपत्ता आहेत. मोदींना लोकशाहीची थोडी चाड असेल तर त्यांनी अमित शाहा यांना मंत्रिमंडळातून बरखास्त केलं पाहिजे. निवडणूक आयोगाशी आणि संविधानाशी एवढा मोठा खेळ 80 वर्षात कोणी केला नाही. ज्ञानेश कुमार यांना बरखास्त करा आणि त्यांच्यावर खटला भरा. कुणाच्या आदेशाने त्यांनी हे केलं याची त्यांच्याकडून कबुली घेतली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.

आर्मीची मदत घ्या

एक गोष्ट स्पष्ट झाली. पश्चिम बंगाल आणि बिहारच्या निवडणुका या एसआयआरच्या माध्यमातून बेईमानी पद्धतीने अमित शाहांनी ज्ञानेश कुमार यांना सोबत घेऊन जिंकल्या आहेत. आम्ही जे बोलत होतो, ते निवडणूक आयोगातील दोन निवडणूक आयुक्तांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं आहे. ज्ञानेश कुमार भ्रष्ट आणि बेईमाान माणूस आहे. अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांनी देशाचं वाटोळं केलं आहे. मोदी हतबल असतील, ज्ञानेश कुमार यांना रोखू शकत नसतील तर देशाच्या राष्ट्रपतींनी हस्तक्षेप केला पाहिजे. देशात असं संकट येत असेल तर अधिकाराचा वापर करून ज्ञानेश कुमार यांना तुरुंगात टाकलं पाहिजे. आर्मीची मदत घ्यावी लागली तर घ्यावा, असंही त्यांनी म्हटलंय.

कोर्ट मार्शल करा

राष्ट्रपतींनी देश वाचवावा. मोदी हतबल आहेत. त्यांना अमित शाह आणि ट्रम्प कंट्रोल करत आहेत. मोदींनी सर्वात आधी अमित शाहांना बरखास्त केलं पाहिजे. नाही तर जन आंदोलन तुमच्या घरापर्यंत धडकल्याशिवाय राहणार नाही. जन आंदोलन करण्याबाबत आमची सर्वांची चर्चा सुरू आहे. त्यात सीजेपीही आहे. निवडणूक आयोग भ्रष्ट आहे. ज्ञानेश कुमार देशाची बेईमानी करत आहेत. त्यांचं कोर्ट मार्शल झालं पाहिजे. कोणताही कायदा मानत नसेल तर त्यांना राष्ट्रपतींनी ताब्यात घेतलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

Follow Us
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
Raju Shetti On Sugarcane Farmers Protest : 61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?