एका सुरेल हरकतीने गाणं थेट काळजाला भिडतं, 4 दशकं लोटली तरी प्रत्येकाच्या ओठांवर
प्रेयसीच्या सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी आतापर्यंत अनेक गाणी आली आणि गेली, पण हे गाणं असं आहे, जे गेली साडे चार दशकं तितकंच लोकप्रिय आहे. आजही या गाण्यातील हरकती प्रेमी युगुलांना आकर्षित करतात.

प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेकदा शब्द कमी पडतात, भावना दाटून येतात आणि अशा वेळी एखादं जुनं, गोड गाणं मनातल्या सगळ्या गोष्टी अगदी सहजपणाने व्यक्त करण्यासाठी कामी येतं. हिंदी चित्रपटसृष्टीत रोमान्सची अनेक गाणी आली आणि गाजली, पण दिग्गज गायक मोहम्मद रफी यांच्या आवाजातील एका सदाबहार गाण्याची बातच काही वेगळी आहे. तब्बल ४६ वर्षे उलटून गेल्यानंतरही हे गाणं आजही तितक्याच तीव्रतेने प्रेमी युगुलांच्या आणि जुन्या गाण्यांच्या चाहत्यांच्या ओठांवर रुंजी घालताना दिसते.
जेव्हा नायक थेट चंद्राला विचारतो प्रेयसीचा पत्ता
प्रेयसीच्या सौंदर्याचं वर्णन करायचं म्हणजे शब्दांची कसरत करावी लागते. मात्र, या अजरामर गाण्यात नायक थेट चंद्र, बाग आणि मयखान्याकडे जाऊन आपल्या प्रेयसीच्या रूपाबद्दल विचारणा करतो, अशी अतिशय सुंदर आणि काव्यमय मांडणी या गाण्यात पाहायला मिळते. आर. डी. बर्मन यांचे सुरेल संगीत, आनंद बक्षी यांचे मधाळ शब्द आणि त्यात मोहम्मद रफी यांच्या आवाजाचा जादूई स्पर्श यामुळे या गाण्यातील प्रत्येक ओळ थेट काळजाचा ठाव घेते.
१९८० चा तो काळ अन् संजय खान-झीनत अमानची जोडी
हे कौतुकास्पद गाणं आहे १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अब्दुल्ला’ या चित्रपटातील, ज्याचे नाव ‘मैने पूछा चांद से’ असे आहे. संजय खान, झीनत अमान आणि राज कपूर यांसारख्या दिग्गज कलाकारांचा अभिनय असलेल्या या चित्रपटातील या गाण्याने रसिकांच्या मनावर गारुड घातले होते. काळ बदलला, तरुणाईच्या आवडी बदलल्या, तरीही रफीसाहेबांच्या आवाजातील या रोमँटिक मेलोडीची मोहिनी आजही तसूभरही कमी झालेली नाही.
गाण्याचे बोल
मैं ने पूछा चाँद से कि देखा है कहीं मेरे यार सा हसीं चाँद ने कहा चाँदनी की क़सम नहीं, नहीं, नहीं मैं ने पूछ चाँद से …
खूब्सूरती जो तूने पाई लुट गई ख़ुदा की बस ख़ुदाई मीर की ग़ज़ल कहूँ तुझे मैं या कहूँ ख़याम की रुबाई मैं जो पूछूँ शायरों से ऐसा दिलनशीं कोई शेर है कहीं शायर कहे शायरी की क़सम नहीं, नहीं, नहीं मैं ने पूछा चाँद से …
मैं ने ये हिजाब तेरा ढूँढा हर जगह शबाब तेरा ढूँढा कलियों से मिसाल तेरी पूछी फूलों में जवाब तेरा ढूँढा मैं ने पूछा बाग़ से फ़लक़ हो या ज़मीं ऐसा फूल है कहीं बाग़ ने कहा हर कली की क़सम नहीं, नहीं, नहीं मैं ने पूछा चाँद से …
हो चाल है कि मौज की रवानी ज़ुल्फ़ है कि रात की कहानी होंठ हैं कि आइने कँवल के आँख है कि मय्क़दों की रानी मैं ने पूछा जाम से फ़लक़ हो या ज़मीं ऐसी मय भी है कहीं जाम ने कहा, मय्कशी की क़सम नहीं, नहीं, नहीं मैं ने पूछा चाँद से …
