आणखी एका नव्या औषधासाठी चार कंपन्या एकत्र, कोरोना रुग्ण लवकर ठीक होत असल्याचा दावा

| Updated on: May 12, 2021 | 8:41 PM

डॉ. रेड्डीज लॅब, सिप्ला, ल्युपीन लिमिटेड आणि सन फार्मा या औषधनिर्मीती करणाऱ्या कंपन्यांनी एली लिली अँड कंपनीशी करार केला आहे. (eli lilly provide baricitinib corona treatment )

आणखी एका नव्या औषधासाठी चार कंपन्या एकत्र, कोरोना रुग्ण लवकर ठीक होत असल्याचा दावा
Baricitnib
Follow us on

नवी दिल्ली : संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. कोरोनावर प्रभावी उपचार करेल असं औषध अजूनतरी सापडलेलं नाही. मात्र, उपलब्ध असलेल्या औषधांचा उपयोग करुन सध्या जगभरात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर आता कोरोनावर उपचार करण्यासाठी आणखी एका औषधाचा उपयोग करण्यात येणार आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार डॉ. रेड्डीज लॅब, सिप्ला, ल्युपीन लिमिटेड आणि सन फार्मा या औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी एली लिली अँड कंपनीशी (Eli and Lilly) करार केला आहे. या कराराअंतर्गत रेमडेसिव्हीर या इंजेक्शनसोबत बॅरीसिटनिब (Baricitinib) या औषधाचा उपयोग करण्यात येणार आहे. (Eli and Lilly pharma company tie up with four pharma companies to provide Baricitinib in India for treatment on corona)

कोरोनाविरोधी लढाई करताना भारत देशाला लवकरच दिलासा मिळू शकतो. डॉ रेड्डीज लॅब्‍स, सिप्‍ला, ल्‍युपिन लिमिटेड आणि सन फार्मा या कंपनीने एली लिली अँड कंपनी या औषध निर्माण करणाऱ्या कंपनीसोबत करार केला आहे. तशी अधिकृत माहिती डॉ. रेड्डीज लॅब्‍सने दिली आहे. सेंट्रल ड्रग्‍स स्‍टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने एली लिली अँड कंपनीने निर्माण केलेल्या बॅरीसिटनिब या औषधाला वापरण्यासाठी मंजुरी दिली आहे. हे औषध रेमडेसिव्हीर इंजेक्शनसोबत वापरण्यात येणार आहे.

बॅरीसिटनिब औषध कोणासाठी उपयोगी ?

सध्या जगात तसेच देशात लाखो कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे. या रुग्णांच्या उपचारासाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर केला जातोय. यामध्ये एली लिली अँड कंपनीने तयार केलेल्या बॅरीसिटनिब या औषधाची भर पडली आहे. मात्र, हे औषध ज्या रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे, अशांनाच देता येईल. ज्या रुग्णांना कृत्रिम प्राणवायू पुरवठ्यावर ठेवण्यात आलेले आहे, अशाच वृद्ध व्यक्तींसाठी या औषधाचा उपयोग करता येईल. या औषधाविषयी सांगताना कोरोनाच्या लढाईमध्ये या नव्या औषधाचा चांगला उपयोग होईल, असे डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने सांगितले आहे.

औषध कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी गुणकारी

बॅरीसिटनिब या औषधाची मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात काही रुग्णांवर चाचणी करण्यात आली होती. यामध्ये हे औषध कोरोना रुग्णांवर गुणकारी असल्याचे सिद्ध झाले होते. या औषधाचा रेमडेसिव्हीरसोबत उपयोग केला तर रुग्ण लवकर बरा होतो, असा निष्कर्ष आहे. एका डॉक्टरने सांगितल्यानुसार कृत्रिम ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर असणारा एखादा रुग्ण जर 18 दिवसांत बरा होणारा असेल तर बॅरीसिटनिबच्या मदतीने हाच रुग्ण 10 दिवसांमध्ये बरा होऊ शकतो.

दरम्यान, जगभरात कोरोनाने कहर केलेला असला तरी आगामी काळात अनेक संशोधनांच्या माध्यमातून कोरोनाला थोपवता येऊ शकते, असा विश्वास शास्त्रज्ञांना आहे. त्यामुळे बॅरीसिटनिब औषधामुळेसुद्धा कोरोनाशी दोन हात करणे सोपेच होणार आहे.

इतर बातम्या :

Maharashtra Coronavirus LIVE Update : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर, दिवसभरात 827 नवे कोरोनाबाधित, 51 रुग्णांचा मृत्यू

मुंबई महापालिकेचं एक पाऊल पुढे, लसीसाठी ग्लोबल टेंडर काढलं, 1 कोटी डोसची मागणी

18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाला तूर्तास ब्रेक : राजेश टोपे

(Eli and Lilly pharma company tie up with four pharma companies to provide Baricitinib in India for treatment on corona)