ईंट का जवाब पत्थर से, काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर ठार, दोन हल्लेखोरांचा खात्मा

सुरक्षा दलांनी लष्कर ए तोयबाच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांना चकमकीत ठार केलं (Encounter of Two terrorist in Baramula).

ईंट का जवाब पत्थर से, काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर ठार, दोन हल्लेखोरांचा खात्मा

श्रीनगर : उत्तर काश्मीरमधील बारामुला जिल्ह्यात करीरी येथे आज (17 ऑगस्ट) दशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जवानांसह जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे एक विशेष पोलीस अधिकारी शहीद झाले. यानंतर काही तासातच सुरक्षा दलांनी लष्कर ए तोयबाच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांना चकमकीत ठार केलं (Encounter of Two terrorist in Baramula).

दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला घेराव घातला होता. संयुक्त शोध मोहिमेत सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक झाली. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान आणि एक पोलीस अधिकारी शहीद झाले. यानंतर प्रत्युत्तरा दाखल केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं.


यातील एकाची ओळख लष्कर ए तोयबाचा (LeT) टॉप कमांडर सज्जाद उर्फ ​​हैदर अशी झाली आहे. पोलीस महानिरीक्षक (आयजी) विजय कुमार यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यामागे लष्कर ए तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा हात होता. यातील दोघे ठार झाल्याने ही पोलीस आणि सुरक्षा दलांची मोठी कामगिरी आहे.

CRPF ने दिलेल्या माहितीनुसार दोन दहशतवादी ठार झाले आहेत. त्यांच्याकडील एक एके रायफल आणि दोन पिस्टोल जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय तिसऱ्या दहशतवाद्याचा शोध सुरु आहे. करीरी परिसरात दहशतवाद्यांनी टेहाळणी करणाऱ्या जवानांच्या तुकडीवर हल्ला केला होता. यात काही जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेले जात असतानाच त्यातील जवानाचा रस्त्यातच मृत्यू झाला.

संबंधित बातम्या :

आयसीसशी संबंधाच्या संशयातून दोघांना अटक, पुण्यात एनआयएची कारवाई

PoK मधून 250-300 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत, कुपवाडात 2 जणांचा खात्मा

लादेनला शहीद म्हणणाऱ्या इम्रान खान यांची कोंडी, भारताकडून संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचा पर्दाफाश

Encounter of Two terrorist in Baramula

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *