लादेनला शहीद म्हणणाऱ्या इम्रान खान यांची कोंडी, भारताकडून संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचा पर्दाफाश

भारताने संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना मिळणाऱ्या मदतीवर जोरदार हल्ला चढवला (India criticize Pakistan for calling laden martyr).

लादेनला शहीद म्हणणाऱ्या इम्रान खान यांची कोंडी, भारताकडून संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचा पर्दाफाश

न्यूयॉर्क : भारताने मंगळवारी (7 जुलै) संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना मिळणाऱ्या मदतीवर जोरदार हल्ला चढवला (India criticize Pakistan for calling laden martyr). या बैठकीत भारताने पाकिस्तावर दहशतवाद्यांना आसरा देणं आणि जम्मू काश्मीरबाबत खोट्या गोष्टी पसरवण्याचा आरोप केला. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले. यात भारताच्या प्रतिनिधीमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव (दहशदवाद विरोधी) महावीर सिंघवी यांनी केलं. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत पाकिस्तानची कोंडी केली.

महावीर सिंघवी यांनी या बैठकीत म्हटलं, “याच दिवशी 12 वर्षांपूर्वी आधी अफगानिस्तानची राजधानी काबुलमध्ये भारतीय दूतावासावर पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनेने हल्ला केला. यात अनेक भारतीय आणि अफगाणी नागरिकांचा मृत्यू झाला. ज्या देशाने मुंबई (2008), पठाणकोट (2016), उरी आणि पुलवामामध्ये दहशतवादी हल्ले केले तोच देश आज जागतिक मंचावर उपदेश देत आहे.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“जागतिक साथीरोगाच्या काळात जग एकत्र येत आहे. दुसरीकडे पाकिस्तान मात्र आपल्या सीमेवरुन दहशतवाद्यांना घुसखोरीस मदत करत आहे. पाकिस्तान प्रत्येक संधीचा उपयोग भारतविरोधी चुकीची वक्तव्यं करण्यात आणि भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी करत आहे. दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. सीमेच्या त्या बाजूने आपल्या सुरक्षित ठिकाणांवरुन हल्ला करण्याचा आणि हत्यारांची तस्करी करण्याचे प्रयत्न होत आले आहेत,” असंही सिंघवी यांनी नमूद केलं.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

संयुक्त राष्ट्राचं हे वेबिनार दहशतवाद विरोधी आठवडा या उपक्रमाचा भाग होता (Virtual Counter-Terrorism Week). यावेळी सिंघवी म्हणाले, “जागतिक स्तरावर दहशतवाद्यांनी साथीरोगाच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या आर्थिक आणि भावनात्मक संकटाच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे. दहशतवादी संघटनांनी या काळात सोशल मीडियाच्या माध्यामतून द्वेष पसरवण्यासाठी भाषणं, खोट्या बातम्या आणि व्हिडीओंमधून खोटी माहिती पसरवण्याचाही प्रयत्न केला. यासाठी त्यांनी ऑनलाईन माध्यमांचा उपयोग केला.”

ओसामा बिन लादेनला शहीद म्हटल्याच्या मुद्यावर पाकिस्तानला झोडपले

सिंघवी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेनला शहीद म्हटल्याच्या मुद्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, “पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेन याला शहीद म्हटलं. यातून पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादी सापडतात ही आठवण होते. इम्रान खान यांनी सार्वजनिकपणे पाकिस्तानमध्ये 40,000 पेक्षा अधिक दहशतवादी असल्याचं मान्य केलं होतं. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या अहवालात देखील लष्कर-ए-तोयबा (जैश) आणि जैश-ए-मोहम्मदचे (JeM) जवळपास 6,500 पाकिस्तानी दहशतवादी अफगानिस्तानमध्ये काम करत असल्याचं म्हटलं होतं.”

हेही वाचा :

Pakistan Train Accident | पाकमध्ये ट्रेन आणि मिनी बसमध्ये जोरदार धडक, 19 शीख भाविकांचा मृत्यू

UNSC | कराची हल्ल्याचे खापर भारतावर फोडण्याचा चीन-पाकचा डाव फसला, भारताला जर्मनी-अमेरिकेची साथ

Pakistan-China | लादेनला ‘शहीद’ म्हणणारे इम्रान खान पाकला दहशतवाद पीडित समजतात

India criticize Pakistan for calling laden martyr

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *