Pakistan-China | लादेनला ‘शहीद’ म्हणणारे इम्रान खान पाकला दहशतवाद पीडित समजतात

ओसामा बिन लादेनला 'शहीद' म्हणणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आता स्वतःच्या देशाला दहशतवादापासून पीडित समजत आहेत.

Pakistan-China | लादेनला 'शहीद' म्हणणारे इम्रान खान पाकला दहशतवाद पीडित समजतात
Follow us
| Updated on: Jul 01, 2020 | 11:11 PM

मुंबई : ओसामा बिन लादेनला ‘शहीद’ म्हणणारे पाकिस्तानचे (Pakistan PM Imran Khan) पंतप्रधान इम्रान खान आता स्वतःच्या देशाला दहशतवादापासून पीडित समजत आहेत. जो देश एकाच वेळी चार-चार आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना थारा देतो. जिथल्या भूमीत डझनभर दहशतवादी संघटनांना पोसलं जातं. तेच इम्रान खान आता कराचीमधील स्टॉक एक्स्चेंज बॉम्बस्फोटावरुन भारताला जबाबदार धरु लागले आहेत (Pakistan PM Imran Khan).

एकीकडे, बलुचिस्तानच्या संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मात्र, दुसरीकडे इम्रान खान हल्ल्यामागे भारताचा हात असल्याचा आरोप करत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी ज्या ओसामाला इम्रान खान यांनी शहीद म्हटलं होतं, तेच इम्रान खान आज दहशतवादाविरोधात बोलत आहेत.

इम्रान खान यांनी भारतावर आरोप केले असले, तरी त्यांचा बोलवता धनी चीन आहे. कारण, चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना कोरोनापासून सावरण्यासाठी राष्ट्रवादाचा मुद्दा धगधगत ठेवायचा आहे. म्हणूनच चीनच्या सांगण्यावरुन पाकिस्ताननं हजारोंच्या संख्येनं सीमेवर सैन्य तैनात केलं. चीन फक्त पाकिस्तानच्या सैन्याशीच नाही, तर दहशतवादी संघटनासोबतही हातमिळवणी करतोय. कारण, भारताविरोधात एका फ्रंटवर लढणं चीनला वाटतं तेवढं सोपं नाही. म्हणून पाकिस्तानला हाताशी घेऊन चीन भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे.

अनेक जाणकारांच्या मते, युद्धाऐवजी चीनचा भारताला अस्थिर ठेवण्याचा डाव आहे. कारण, जर उद्या युद्ध झालं, तर भारताला दोन फ्रंटवर घेरणारा चीन स्वतः घेरला जाणार आहे. कारण, तैवान, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे तिन्ही देश टपूनच बसले आहेत. मागच्या आठवड्याभरात या तिन्ही देशांशी चीनच्या सैन्यानं पंगा घेतला. तर इतर काही जणांच्या मते नेपाळचं कार्ड वापरुन झाल्यानंतर चीन आता पाकिस्तानचं कार्ड खेळू पाहतो आहे. कारण, नेपाळमध्ये चीन ज्या ओलींच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतावर नेम धरु पाहत होता, तेच ओली नेपाळमधल्या कम्युनिस्टांच्या निशाण्यावर आले आहेत (Pakistan PM Imran Khan).

मात्र, जगभरातून कर्ज घेऊन ठेवल्यानं पाकिस्तानची चहुबाजूंनी कोंडी झाली आहे. एकीकडे, अमेरिकेच्या दबावानं खुलेपणानं चीनची बाजू सुद्धा घेता येत नाही आणि दुसरीकडे, चीनच्या कर्जामुळे चीनला थेटपणे नकार सुद्धा देता येत नाही. म्हणूनच जो पाकिस्तान अल्पसंख्याकांच्या मुद्द्यांवरुन नेहमी गळे काढतो, तोच पाकिस्तान चीनमधल्या मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत चकार शब्दही काढत नाही.

भारत-चीन वादाचं जे होईल ते होईल. मात्र, ज्या पाकिस्तानवर कोरोनासाठी सुद्धा जगाकडून कर्ज घेण्याची वेळ येते. तो पाकिस्तान त्याचं कर्जाचं ऋण फेडता-फेडता स्वतःला विनाशाच्या वाटेकडे नेणार आहे (Pakistan PM Imran Khan).

संबंधित बातम्या :

चीनमधून वस्तू मागवणाऱ्या उद्योगपतींना भारतीय कस्टम विभागाचा दणका

भारताकडून लडाखमध्ये ‘आकाश’ क्षेपणास्त्र तैनात, चीनला जशास तसं उत्तर देण्यासाठी शस्त्रसज्जता

India China face off : गलवान संघर्षावर भेकड चिनी प्रवक्त्यांचा नवा दावा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.