मोठी बातमी! चार खासदार अन् 67 प्रवासी असलेल्या विमानाचं इंजिन फेल; रन वे च्या दिशेनं येत असतानाच थेट…
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधून मोठी बातमी समोर आली आहे. 67 प्रवासी असलेल्या विमानाचं इंजिन फेल झालं आहे. विशेष म्हणजे या विमानामध्ये चार खासदार देखील होते.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधून मोठी बातमी समोर आली आहे. मोठा विमान अपघात थोडक्यात टळला आहे. कोलकाता एअरपोर्टवर इंडिगोच्या (IndiGo) एका विमानाचं इंजिन अचानक फेल झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये चांगलंच भीतीचं वातावरण निर्माण झालं. समोर आलेल्या माहितीनुसार हे विमान कोलकाता येथून शिलाँगला निघालं होतं. विमान पार्किंग वे वरून रन वेच्या दिशेनं जात असतानाच अचानक या विमानाचं इंजिन बंद पडलं. ज्या विमानाचं इंजिन फेल झालं, त्या विमानामध्ये डीएमकेचे खासदार पी. विल्सन यांच्यासह चार खासदार आणि 67 प्रवासी होते. दरम्यान या घटनेनंतर विमानातील सर्व प्रवासी तब्बल दोन तास विमानामध्येच अडकून पडले होते. हे विमान धावपट्टीकडे निघालं असतानाच या विमानाचं इंजिन फेल झालं.
मिडिया रिपोर्टनुसार इंडिगोची फ्लाइट क्रमांक 6E 7423 सोमवारी कोलकातावरून शिलाँगला जाणार होती. या विमानात प्रवासी बसले होते. त्यानंतर हे विमान पार्किंग वे वरून रन वेच्या दिशेनं निघालं होतं. मात्र त्याचवेळी या विमानाचं इंजिन बंद पडलं. त्यानंतर तब्बल दोन तास हे सर्व प्रवासी विमानामध्ये अडकून पडले होते. विशेष म्हणजे या विमानामध्ये चार खासदार होते. खासदार पी. विल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार विमान उड्डाणाच्या तयारीमध्ये असतानाच त्याचं एक इंजिन बंद पडलं होतं, त्यामुळे विमान थांबवण्यात आलं. त्यानंतर दोन तास प्रवासी विमानामध्येच होते.
दरम्यान ही घटना घडल्यानंतर काही वेळाने विमानात काही तात्रिक बिघाड झाला असल्यामुळे विमानाचं उड्डान थांबवण्यात आल्याची माहिती पायलटने प्रवाशांना दिली. या घटनेनंतर डीएमकेचे राज्यसभा खासदार पी. विल्सन यांनी ट्विट करत या घटनेबाबत माहिती दिली. ही घटना घडली तेव्हा माझ्यासोबत अन्य तीन खासदार होते, तसेच या विमानातून 67 प्रवासी प्रवास करत होते असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेनंतर पी. विल्सन यांनी विमान कंपनी तसेच डीजीसीएवर जोरदार हल्लाबोल केला आहे.