AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Dia Mirza : दिवाळी हिंदू लोकांचा सण, दिया मिर्झाने सांगू नये, रितू तावडे भडकल्या; त्या व्हिडीओवरून वाद चिघळला!

दिया मिर्झाच्या व्हिडीओनंतर रितू तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यापुढे जाहिरातीसाठी कोणाला घ्यायचं, जाहिरातीत कोणता कलाकार असणार ते मी बघणार, असं रितू तावडे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

BMC Dia Mirza : दिवाळी हिंदू लोकांचा सण, दिया मिर्झाने सांगू नये, रितू तावडे भडकल्या; त्या व्हिडीओवरून वाद चिघळला!
dia mirza and ritu tawdeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 02, 2026 | 4:35 PM
Share

BMC Dia Mirza Video Clash : मुंबई महापालिकेकडून पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले जातेय. त्यासाठी अनेक सिनेकलाकार आणि सेलिब्रिटींची मदत घेतली जातेय. अभिनेत्री दिया मिर्झानेही पर्यावरणपुरक दिवाळी साजरा करण्याचे आवाहन केले होते. तिचा एक व्हिडीओ मुंबई पालिकेने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. परंतु तिच्या या व्हिडीओनंतर मोठा वाद झालाय. मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी दिया मिर्झाने आम्हाला दिवाळी कशी साजरी करावी, हे शिकवण्याची गरज नाही, असं म्हणत तिच्या आवाहनावर आक्षेप घेतलाय. त्यानंतर दिया मिर्जाचा व्हिडीओ सोशल मीडियावरून डिलीट करण्यात आलाय. असे असतानाच आता मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही आपली भूमिका मांडली आहे. आमचा दिया मिर्झाला कायम विरोध असेल. दिया मिर्झान नेहमी हिंदूविरोध भूमिका घेते, असे तावडे म्हणाल्यात.

देशविरोधी कारवाईला हात मिळवणी करण्याचं दियाचं काम

दिया मिर्झाच्या व्हिडीओनंतर रितू तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यापुढे जाहिरातीसाठी कोणाला घ्यायचं, जाहिरातीत कोणता कलाकार असणार ते मी बघणार, असं रितू तावडे यांनी यावेळी स्पष्ट केलं. दिया मिर्झा या पहिल्यांदाच वादग्रस्त ठरलेल्या नाहीत. त्यांनी देशविरोधी कारवाईला हात मिळवणी करण्याचं काम केलंय. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाला खोडून काढण्याचं काम दिया मिर्झा यांनी केलंय. त्यामुळे त्यांनी हिंदू सणाच्या बाबतीत शिकवू नये. दिया मिर्झाने आम्हाला शिकवू नये, अशी रोखठोक भूमिका दिया मिर्झाने घेतलीय.

दिया मिर्झाने शिकवणं आम्हाला मान्य नाही

हिंदू लोकांनी कशी दिवाळी साजरी करायची हे दिया मिर्झाने सांगू नये. हवेची गुणवत्ता खालावतेय. त्यामुळे जनजागृतीसाठी कलाकारांची मदत घ्या, असे उच्च न्यायालयाने सांगितले होते. कलाकारांची निवड करण्याआधी पालिकेच्या जनसंपर्क विभगाने आम्हाला दाखवायला हवे होते. दिवाळी हा हिंदू लोकांच सण आहे. दिया मिर्झाने शिकवणं हे आम्हाला मान्य नाही. हिंदू विरोधी संस्थांना कायम त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय.

दिया मिर्झाची काय प्रतिक्रिया आली?

मी याबाबत पालिका आयुक्तांकडून खुलासा घेणार आहे. जन जागृती करताय, पण कोणत्या कलाकारांना घेणार त्याची यादी माझ्याकडे यायला पाहिजे. हिंदुत्ववादाचा आमचा अजेंडा आहे, असेही पुढे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महापालिकेने व्हिडीओ हटवल्यानंतर दिया मिर्झाने प्रतिक्रिया दिलीय. मी त्या व्हिडीओसाठी एक रुपयाही घेतलेला नाही. चांगले काम करण्याचे दिवस राहिले नाहीत, असे दिया मिर्झा म्हणाली.

Follow Us
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद
दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये...
Ritu Tawde on Dia Mirza : दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये; दिया मिर्झाच्या त्या व्हिडीओवरून महापौर आक्रमक
माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख कोणाकडे?
Ravindra Dhangekar : माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख नेमका कोणाकडे?
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची...
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची महत्त्वपूर्ण सभा अन्...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात जमा होण्यास सुरुवात
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला....
Walmik Karad : वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला पिस्तूल लावलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ॲपवर मैत्री करणं पडलं महागात! व्हिडीओच्या आधारे बीडच्या व्यापाऱ्याला..
Beed : ॲपवर मैत्री करणं पडलं महागात! खासगी व्हिडीओच्या आधारे बीडच्या व्यापाऱ्याला तब्बल एवढ्या लाखांचा गंडा
राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शाहांशी रात्री उशिरा भेट; राजकीय चर्चां
राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शाहांशी रात्री उशिरा भेट; राजकीय चर्चांना उधाण
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांचा आक्षेप
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांच्या आक्षेपानंतर काय घडलं?
दिवाळीच्या सेलिब्रिटी कॅम्पेनवरुन पालिकेत वादाची शक्यता, दिया मिर्झा..
Mumbai BMC : दिवाळीच्या सेलिब्रिटी कॅम्पेनवरुन पालिकेत वादाची ठिणगी