AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीकेंडला दारू पिणं महिलांसाठी फायदेशीर? ब्रेस्ट कॅन्सरशी कनेक्शन? जाणून घ्या फॅक्ट

सध्या महिलांमध्ये वीकेंडला दारू पिणं ही एक फॅशन बनली आहे, पण याचा स्तन कर्करोगाशी गंभीर संबंध आहे. जागतिक आरोग्य संघटना सांगते की, कर्करोगासाठी दारूची कोणतीही सुरक्षित मात्रा नाही. दारूमुळे हार्मोनल बदल होतात आणि डीएनएला नुकसान पोहोचते, ज्यामुळे धोका वाढतो. प्रतिबंधासाठी मद्यपान टाळा आणि योग्य काळजी घ्या.

वीकेंडला दारू पिणं महिलांसाठी फायदेशीर? ब्रेस्ट कॅन्सरशी कनेक्शन? जाणून घ्या फॅक्ट
Weekend Drinking and Breast Cancer Risk in WomenImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 02, 2026 | 4:40 PM
Share

सध्याच्या काळात वीकेंडला दारू पिणं ही एक फॅशन झाली आहे. महिलांना असं वाटतं की आपण रोज दारू नाही प्यायलो आणि वीकेंडला दारू प्यायलो तर त्याचा आरोग्यावर काही परिणाम होत नाही. पण महिलांची ही धारणा योग्य आहे का? त्याला काही आधार आहे का? मद्यपान हे महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवणारे एक महत्त्वपूर्ण आणि टाळता येण्याजोगे कारण आहे की नाही हे स्तन कर्करोग जनजागृती महिन्याच्या निमित्ताने हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO)च्या मते, कॅन्सरच्या धोक्याच्या संदर्भात दारूच्या सेवनाची कोणतीही सुरक्षित मात्र ठरवलेली नाही. इंटरनेशनल एजेंसी फॉर रिसर्च ऑन कँसर (IARC) ने दारूला ग्रुप 1 कार्सिनोजेनच्या श्रेणीत ठेवलं आहे. याचा अर्थ याचे कॅन्सर निर्माण करण्याचे पर्याप्त वैज्ञानिक प्रमाण उपलब्ध आहेत. दारू शरीरातील अॅस्ट्रोजन सारख्या हार्मोनच्या स्तराला प्रभावित करू शकते. त्याशिवाय, दारूपासून बनणारा अॅसीटॅल्डिहाइड नावाचा हानीकारक पदार्थ कोशिकांच्या डीएनएला नुकसान पोहोचवतो.

वीकेंडला दारू पिणे योग्य आहे?

केवळ वीकेंडला दारू प्यायल्याने नुकसान होत नाही. कॅन्सरचा धोका दारूची एकूण मात्रा आणि पिण्याच्या पद्धतीने प्रभावित होतो. कमी प्रमाणात दारू घेतल्यानेही कॅन्सरचा धोका कमी होत नाही. दरम्यान, दारू पिणाऱ्या प्रत्येक महिलेला कॅन्सर कसा होणार? असं नाही. पण दारू प्यायल्याने आजार बळावण्याची शक्यता अधिक बळावते.

धूम्रपानाने धोका वाढतो

दारू आणि धूम्रपानाचं एकसाथ सेवन करणं आरोग्याला हानिकारक होऊ शकतं. काही अभ्यासात दोन्ही गोष्टी करणााऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा अधिक धोका असल्याचं आढळून आलं आहे. धूम्रपानातील हानिकारक रसायनामुळे डीएनएला नुकसान पोहोचवते. तर दारू हार्मोनल बदल आणि अन्य प्रक्रियाच्या माध्यमातून कॅन्सरचा धोका वाढवते. तथापी, ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबत दोन्हींच्या संयुक्त प्रभावाला निश्चितपणे योगात्मक (Additive Effect) म्हणणं अजूनही अभ्यासातून स्पष्ट झालेलं नाही.

धोका कसा टाळता येईल?

महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळायचा असेल तर दारू आणि धूम्रपानापासून दूर राहिलं पाहिजे. त्यासोबतच नियमित शारीरिक कसरत, संतुलित आहार, वजन आणि आरोग्याचा सल्ला घेऊन ब्रेस्ट स्क्रीनिंग करणंही आवश्यक आहे. स्तनात गाठ, निप्पलमधून असामान्य स्त्राव वा स्तनाचे आकार अथाव त्वचेतील बदल झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)

Follow Us
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद
दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये...
Ritu Tawde on Dia Mirza : दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये; दिया मिर्झाच्या त्या व्हिडीओवरून महापौर आक्रमक
माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख कोणाकडे?
Ravindra Dhangekar : माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख नेमका कोणाकडे?
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची...
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची महत्त्वपूर्ण सभा अन्...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात जमा होण्यास सुरुवात
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला....
Walmik Karad : वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला पिस्तूल लावलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ॲपवर मैत्री करणं पडलं महागात! व्हिडीओच्या आधारे बीडच्या व्यापाऱ्याला..
Beed : ॲपवर मैत्री करणं पडलं महागात! खासगी व्हिडीओच्या आधारे बीडच्या व्यापाऱ्याला तब्बल एवढ्या लाखांचा गंडा
राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शाहांशी रात्री उशिरा भेट; राजकीय चर्चां
राष्ट्रवादीच्या नेत्यांची अमित शाहांशी रात्री उशिरा भेट; राजकीय चर्चांना उधाण
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांचा आक्षेप
दिया मिर्झाचा दिवाळी व्हिडिओ पालिकेने हटवला; अमित साटम यांच्या आक्षेपानंतर काय घडलं?
दिवाळीच्या सेलिब्रिटी कॅम्पेनवरुन पालिकेत वादाची शक्यता, दिया मिर्झा..
Mumbai BMC : दिवाळीच्या सेलिब्रिटी कॅम्पेनवरुन पालिकेत वादाची ठिणगी