AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mango on EMI : रसाळ आंब्याच्या राजाची अनोखी चव चाखा, पैसे हप्त्याने फेडा!

Mango on EMI : उन्हाळ्यात आंब्याची चव चाखायला मिळणे म्हणजे पर्वणीच की. जर हा रसाळ आंबा हप्त्यावर मिळाला तर मग वारे न्यारेच की ...

Mango on EMI : रसाळ आंब्याच्या राजाची अनोखी चव चाखा, पैसे हप्त्याने फेडा!
| Updated on: Apr 09, 2023 | 8:04 PM
Share

नवी दिल्ली : उन्हाळ्यात आंब्याची चव चाखण्यासारखं दुसरं सूख नाही. आंब्याची अढी सुटली की गावाकडे त्यावर आपण बालपण मनसोक्त ताव मारला असेल. आंबे गवतात, कागदात गुंडाळून ते पिकण्याची वाट पाहिली असेल. अनेक जण तर उन्हाळ्यात दररोज रसाळ्या झोडतात. म्हणजे रसाचे जेवण करतात. पण गावाकडील आंब्यात गावरान आंबे अंबटगोड असतात. तर आता दशहरी, केशर, बादाम आणि इतर आंब्यांची आवक होते. पण हापूस (Alphonso) आंबा आपण नाव ऐकूनच असतो. कारण तो आंब्याचा राजा म्हणून फेमस आहे आणि हा राजा आपल्या खिशाला काही परवडत नाही. पण आता तुम्हाला हापूसची पण चव चाखता येईल. त्यासाठीच ही खास EMI ची ऑफर आणली आहे.

हापूसचा भाव काय अप्रतिम स्वाद आणि गोडव्यासाठी हापूस ओळखल्या जातो. महाराष्ट्रातील देवगड आणि रत्नागिरीमध्ये हापूसचे मोठे उत्पादन होते. सर्व प्रकारच्या आंब्यांमध्ये हापूसची वेगळी ओळख आहे. त्याला आंब्याचा राजा म्हणतात. या आंब्याच्या या वैशिष्ट्यामुळे तो महाग झाला आहे. हा आंबा सर्वसामान्यांच्या जेवणातून कायम हद्दपार असतो. त्याचे कारण म्हणजे त्याची किंमत. किरकोळ बाजारात हापूसची किंमत 800 ते 1300 रुपये डझन या दरम्यान असते. त्यामुळे सर्वसामान्यांना हा आंबा परवडत नाही. त्यासाठी आता खास योजना आखण्यात आली आहे.

ईएमआयवर हापूस पीटीआयने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, विक्री सुरु होताच हापूसचे दर गगनाला भिडतात. त्यामुळे सर्वांनाच या आंब्याची चव चाखता यावी यासाठी ईएमआयचा पर्याय समोर आणण्यात आला आहे. गुरुकृपा ट्रेडर्स आणि फ्रूट प्रोडक्टसचे गौरव सनस यांनी ही अभिनव योजना आणली आहे. देशात ईएमआयवर आंबा विक्री करणारे त्यांचे पहिले दुकान ठरले आहे. सर्वच वस्तू ईएमआयवर , हप्त्यावर मिळत असताना हापूस का नको, या विचारातून त्यांनी ही स्कीम सुरु केली आहे. त्यासाठी अर्थातच काही अटी आणि शर्ती आहेत.

काय आहेत अटी कोणत्याही व्यक्तीला हापूसची चव आता चाखता येणार आहे. त्यासाठी सनस यांच्या दुकानावर जावे लागेल. तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे. तुम्हाला 3,6 अथवा 12 महिन्यांच्या हप्त्यावर हापूस आंबा खरेदी करता येईल. पण त्यासाठी कमीत कमी 500 रुपयांची ऑर्डर द्यावी लागेल. आतापर्यंत सनस यांच्याकडे चार लोकांनी ईएमआयवर हापूसची खरेदी नोंदवली आहे. ऑनलाईन ऑर्डरविषयी मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Follow Us
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल