Explainer : अमेरिकेचा 25 टक्के टॅरिफ, भारतावर काय परिणाम होणार?

अमेरिकेनं मोठा निर्णय घेतला आहे, अमेरिकेनं भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचं मत नेमकं काय आहे? याचा काय परिणाम होऊ शकतो, त्याबद्दल जाणून घेऊयात.

Explainer : अमेरिकेचा 25 टक्के टॅरिफ, भारतावर काय परिणाम होणार?
Image Credit source: टीव्ही 9 नेटवर्क
| Updated on: Jul 30, 2025 | 8:09 PM

मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अमेरिकेनं मोठा निर्णय घेतला आहे, अमेरिकेनं भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे.  येत्या 1 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत या निर्णयाबाबत माहिती दिली आहे. दोन्ही देशांमध्ये सर्व काही ठीक नाही, येत्या एक ऑगस्टपासून या नव्या निर्णयाची अंमलबजावणी होईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भारतावर काय परिणाम होणार? अर्थव्यवस्थेवर या निर्णयाचा काही परिणाम होणार का? असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे, त्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील तज्ज्ञांना नेमकं काय वाटंत? याबद्दल जाणून घेऊयात.

भारतावर काय परिणाम होणार?

अर्थव्यवस्थेचे विश्लेषक केदार ओक यांच्या मते अमेरिकेनं भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचा लगेचच बाजारावर कोणताही इम्पॅक्ट जाणवणार नाही, ही फक्त एक प्रोव्हिजन आहे,  त्यांचे प्रतिनिधी मंडळ येणार आहे, त्यावर विश्लेषन होईल, मग खरा निर्णय समोर येईल. अशा निर्णयामुळे बाजारात अनियमितता तयार होते, त्यामुळे नेहमी अमेरिकेच्या बाँडमध्ये गुंतवणूक होते, त्याने डॉलर मजबूत होतो, मात्र या निर्णयामुळे त्यापलीकडे फार काही होणा नसल्यानं सामान्य लोकांना टेन्शन घेण्याची गरज नसल्याचं केदार ओक यांनी म्हटलं आहे.

संरक्षण विश्लेषक सतीश ढगे यांच्या मते एक ऑगस्ट पासून अमेरिकेने भारतावर 25 टक्के टेरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे आणि असे करून अमेरिका भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेची इच्छा आहे की त्यांच्याकडे असलेल्या कृषी कंपन्या आणि त्यांना भारतात स्थान मिळावे, पण भारताने याला स्थान मिळू नये म्हणून प्रयत्न केले, हेच अमेरिकेला आवडले नाही, म्हणून दबाव तंत्राचा वापर करत त्यांनी 25 टक्के टेरिफ लावण्याचा निर्णय घेतला असेल अशी शक्यता आहे.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे भारताने जेव्हा -जेव्हा व्यापासंदर्भात निर्णय घेतला तेव्हा-तेव्हा भक्त देशाचं हीत पाहिलं आहे. भारतानं सर्व निर्णय हे देश हिताचे घेतले आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, यामुळे रशियानं भारताला कमी किंमतीमध्ये क्रूड ऑईल उपलब्ध करून दिले, भारताला जेवढ्या क्रूड ऑईलची गरज आहे, त्यातील 40 टक्के तेलाची आयात भारताने रशियाकडून केली आहे, हे देखील अमेरिकेला आवडले नाही, त्यामुळे देखील त्यांनी तसा निर्णय घेतला आहे, परंतु ट्रम्प यांचे मागील निर्णय पाहाता, ते लवकरच हा निर्णय देखील रद्द करतील, ते युटर्न घेण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे सामान्य लोकांना चिंता करण्याची गरज नसल्याचं ढगे यांनी म्हटलं आहे.