
पाकिस्तानची गुप्तचर संस्था खास करुन आयएसआय ( इंटर-सर्व्हीसेस इंटेलिजन्स ) भारताविरोधात अनेक प्रकारच्या गुप्त कारवाया करीत असते. अनेक प्रकारच्या गुप्त माहीती मिळवत असते. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय ( इंटर-सर्व्हीसेस इंटेलिजन्स ) भारतातीलच लोकांचा वापर करुन आपले इप्सित साध्य करीत असते. हरियाणाचा युट्युबर ज्योती मल्होत्रा हीचा अशा प्रकारे वापर झाल्यानेच तिला अटक करण्यात आली आहे. जगभरातील अनेक देशात गुप्त कारवाया करण्याचे ट्रेंड अनेक वर्षांपासून सुरु आहे. यामुळे देशांतर्गत गुप्त माहीती दुसऱ्या देशापर्यंत पोहचले. नंतर ते देश त्या माहीतीवर प्रोसेस करुन तिच्यावर आणखी मेहनत करुन या माहितीचा वापर संबंधित देशात कारवाया करण्यासाठी करीत असतात. ...